Thane Borivali twin tunnel: वेळ वाचणार! ठाणे- बोरिवली ट्विन टनेलचा मार्ग मोकळा, प्रवास फक्त १५ मिनिटात

Thane Borivali Twin Tunnel Project: ठाणे बोरिवली ट्विन टनेलचा मार्ग मोकळा झाला आहे. बोरिवली बाजूकडील उर्वरीत ३,६५८ चौ.मी जागा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने एमएमआरडीएकडे हस्तांतरीत केली आहे.
Twin tunnel project
Twin tunnel projectSaam Tv News
Published On

ठाणे बोरिवली ट्विन टनेलचा मार्ग मोकळा झाला आहे. बोरिवली बाजूकडील उर्वरीत ३,६५८ चौ.मी जागा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने एमएमआरडीएकडे हस्तांतरीत केली आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या भूसंपादनातील अडथळे दूर झाले असून, प्रकल्पाचे काम लवकर सुरू होणार आहे. या ठाणे बोरिवली ट्विन टनेलमुळे १५ मिनिटात प्रवाशांचा प्रवास पूर्ण होणार आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरकरांना थेट ठाण्याशी जोडण्यासाठी ठाणे - बोरिवली ट्विन टनेल उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाला भूसंपादनाचा अडथळा होता. बोरिवली बाजूकडील उर्वरीत ३,६५२ चौ. मी. जागा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे होते. मात्र आता ही जागा एमएमआरडीएकडे हस्तांरित करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या भूसंपादनातील अडथळे दूर झाले असून, या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे.

Twin tunnel project
Saif Ali Khan Attack: सैफ अली खान हल्ला प्रकरणावरून राजकारण तापलं, शरद पवार गटाचा गंभीर आरोप; भाजपकडून थेट माफीची मागणी

एमएमआरडीएकडून ठाणे - बोरिवलीदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून ११.८५ किलोमीटर लांबीच्या मार्गाची उभारणी केली जात आहे. यात १०.२५ किमी लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी १८,८३२ कोटी रूपये खर्च होणार असल्याची माहिती आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाला महत्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्पाचा दर्जा दिला आहे.

Twin tunnel project
Dhananjay Munde: 'मैं आईना हुं आईना दिखाऊंगा', अजित दादांसमोर धनंजय मुंडे फडाफडा बोलले..

शाफ्ट उभारणीचे काम सुरू

एमएमआरडीएने या प्रकल्पाचे काम मेघा इंजिनिअरिंग या कंपनीला जून २०२३ साली दिले होते. आता या प्रकल्पाचे ठाणे बाजूकडील काम सुरू झाले असल्याची माहिती आहे. कंत्राटदाराने भुयारीकरणासाठी टीबीएम मशीन बोगद्यात उतरविण्यासाठी शाफ्ट उभारणीचे काम सुरू झाले आहे. मात्र, बोरिवली बाजूकडील भुयारीकरणापूर्वीची प्राथमिक कामे सुरू झालेली नाहीत. त्यामध्ये भूसंपादनाचा अडथळा होता. पण आता एसआरनं प्रकल्पासाठी आवश्यक सर्व जमीन एमएमआरडीएकडे हस्तांतरीत केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com