Railway Mega Block: पुणे-दौंड मार्गावर विशेष ब्लॉक; पुढील दोन दिवस अनेक रेल्वेगाड्या रद्द

Pune Railway Mega Block: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. पुणे-दौंड रेल्वे मार्गादरम्यान विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे.
indian railways announce pune-daund railway block on patna station many trains cancelled for two days
indian railways announce pune-daund railway block on patna station many trains cancelled for two daysSaam TV
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही

Railway Mega Block Latest News

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. पुणे-दौंड रेल्वे मार्गादरम्यान विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. पाटस येथे तांत्रिक कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस काही ट्रेन उशिराने धावणार असून अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेने याबाबतची माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

indian railways announce pune-daund railway block on patna station many trains cancelled for two days
Maharashtra Rain Alert: राज्यात पुढील ४८ तासांत पाऊस धुमाकूळ घालणार; 'या' भागात अतिवृष्टीचा इशारा

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच मंगळवारी (३ ऑक्टोबर) विविध तांत्रिक कामासाठी पुणे-दौंड रेल्वे मार्गावरील (Pune Railway) पाटस स्थानकावर ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या मार्गाने धावणाऱ्या काही गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच ट्रेनने प्रवास करावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

कोणकोणत्या गाड्या रद्द

पाटस येथे घेण्यात येणाऱ्या विशेष ब्लॉकमुळे (Pune Mega Block) पुणे -सोलापूर -पुणे एक्स्प्रेस, पुणे- बारामती पैसेंजर, पुणे - दौंड पैसेंजर, बारामती - दौंड पैसेंजर, दौंड -पुणे पैसेंजर आणि दौंड- हडपसर पैसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

याशिवाय काही रेल्वेगाड्या सुटण्याची तसेच पोहचण्याची ठिकाणे देखील बदलण्यात आली आहे. यामध्ये २ ऑक्टोबर रोजी इंदूर येथून सुटणारी इंदूर-दौंड एक्स्प्रेस ही गाडी पुण्यापर्यंत धावेल. तसेच ३ ऑक्टोबरला दौंडवरून सुटणारी दौंड- इंदूर एक्स्प्रेस ही गाडी पुण्यातून सुटणार आहे.

याशिवाय हैदराबाद येथून सुटणारी हैदराबाद-हडपसर एक्स्प्रेस ही गाडी २ ऑक्टोबरला दौंडपर्यंत धावणार आहे. तसेच ३ ऑक्टोबरला हडपसरवरून सुटणारी हडपसर-हैदराबाद एक्स्प्रेस ही गाडी दौंडमधून सुटणार आहे, या ब्लॉकनंतर ट्रेन सुरळीत होईल, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

Edited by - Satish Daud

indian railways announce pune-daund railway block on patna station many trains cancelled for two days
CNG-PNG Price: आनंदाची बातमी! सीएनजी-पीएनजीच्या दरात मोठी कपात; मुंबईत मध्यरात्रीपासूनच दर बदलले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com