Mumbai News: मुंबईकरांचा नोकरीसाठी जीवघेणा प्रवास; ३ महिन्यांत लोकलमधून पडून मृत्यू झालेल्यांची आकडेवारी धक्कादायक

Death After Falling From Local Train: नोकरीसाठी मुंबईकर जीवघेणा प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे. ३ महिन्यांत लोकलमधून पडून आजपर्यंत तब्बल १३९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
Death After Falling From Local Train
Death After Falling From Local TrainYandex

नोकरीसाठी मुंबईकर जीवघेणा प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे. ३ महिन्यांत लोकलमधून (Mumbai Local Train) पडून मृत्यू आजपर्यंत तब्बल १३९ लोकांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंना जबाबदार कोण, असा प्रश्न यावेळी निर्माण होतो. रखडलेले प्रकल्प आणि मर्यादित फेऱ्यांमुळे नागरिकांवर जीवघेण्या प्रवासाची वेळ आली असल्याचं दिसत आहे.

नुकतंय रीया नावाच्या तरूणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण ५६५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची (Local Train) आकडेवारी मिळत आहे. यामध्ये गर्दी हे एक प्रमुख कारण आहे. गर्दी असल्यामुळे लोकलमधून पडून १३९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती लोकसत्ताच्या हवाल्यानुसार मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अवधेश दुबे या तरूणाचा देखील लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली (Mumbai News) होती.

मागील तीन महिन्यांत लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या प्रवाशांची आकडेवारी धक्कादायक आहे. मुंबईकर लोकलमध्ये चढण्यासाठी जीवाची बाजी लावत असल्याचं नेहमीच दिसतं. लोकल चुकू नये म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करताना (Falling From Local Train) देखील दिसतात. लोलकमधून पडून अनेक प्रवासी आजवर अपंग झाले आहेत, तर शेकडोंनी मृत्यूला कवटाळल्याचं दिसत आहे.

लोकलची घटलेली संख्या, मर्यादित फेऱ्या, रखडलेले प्रकल्प, प्रचंड वाढती गर्दी, विस्कळीत वेळापत्रक या चक्रामध्ये मुंबईकर अडकले आहेत. कल्याण-बदलापूर-कर्जत, कल्याण- आसनगाव-कसारा या मार्गांचा विस्तार आणि कळवा-ऐरोली उन्नत मार्ग हे रेल्वे प्रकल्प रखडलेले आहेत. त्यामुळे लोकलच्या फेऱ्यांवर मर्यादा आलेल्या आहेत. परिणामी नागरिक गर्दीत, लटकून लोकलने प्रवास (Passengers Death) करत आहेत.

Death After Falling From Local Train
Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

आतापर्यंत रूळ ओलंडताना मध्य रेल्वेत १६६ तर पश्चिम रेल्वेत १२० प्रवाशांचा मृत्यू झालाय. तर लोकलमधून पडून मध्य रेल्वेत ९२ तर पश्चिम रेल्वेत ४७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. खांबावर धडकल्याने मध्य रेल्वेत २ नागरिकांचा मृत्यू (Death After Falling From Local Train) झालाय. विजेचा धक्का लागून मध्य रेल्वेत १ तर पश्चिम रेल्वेत एका प्रवाशाचा मृत्यू झालाय. नैसर्गिकरित्या मध्य रेल्वेत ५६ तर पश्चिम रेल्वेत ४८ नागरिकांचा मृत्यू झालाय. लोकलखाली आत्महत्या केलेल्यांची संख्या मध्य रेल्वेत १३ तर पश्चिम रेल्वेत ६ जणांचा मृत्यू झालाय.

Death After Falling From Local Train
Mumbai Local Train : ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी; जूनपर्यंत प्रत्येक डब्ब्यात असणार टॉकबॅक अन् सीसीटीव्ही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com