Thane Water: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, बुधवारी शहरात पाणी कपात

Thane Water Supply Update: ठाणे महानगरपालिकेच्या टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात होणाऱ्या देखभाल कामांमुळे पाणीपुरवठा १२ तास बंद राहणार. त्यामुळे ठाणेकरांनो पाणी जपून वापरा.
Thane Water Supply
Thane Water SupplySaam Tv News
Published On

ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ४ जून रोजी ठाण्याच्या काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेतील टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात बुधवार, ४ जून २०२५ रोजी अत्यावश्यक देखभालीची कामे होणार आहेत. याच पार्श्वभुमिवर ठाण्यातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या स्वयंचलित पाणीपुरवठा योजनेतील टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब उपकेंद्रात पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक देखभाल, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, तसेच ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन ही कामे बुधवार, ०४ जून २०२५ रोजी हाती घेण्यात येणार आहेत. या कामांच्या अनुषंगाने बुधवार, ०४ जून रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Thane Water Supply
Shocking: पत्नीचे दीरासोबत अनैतिक संबंध, बायकोला नको त्या अवस्थेत पाहिलं; संतापलेल्या नवऱ्यानं भावालाच संपवलं

परिणामी, बुधवार ०४ जून रोजी स. ९.०० ते रा. ९.०० वाजेपर्यंत ठाण्यातील १२ भागातील पाणीपुरवठा बंद असणार आहे.

ठाण्यातील पाणीपुरवठा बंद राहणारे भाग खालीलप्रमाणे:

घोडबंदर रोड

वर्तक नगर

ऋतू पार्क

जेल परिसर

गांधी नगर

रुस्तमजी

सिध्दांचल

समता नगर

सिध्देश्वर

इंटरनिटी

जॉन्सन

कळव्याचा काही भाग.

या भागांमध्ये १२ तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. इतर भागात, स्टेम प्राधिकरणामार्फत येणारा पाणी पुरवठा झोनिंग करुन सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणेकरांनी कृपया याची नोंद घ्यावी.

Thane Water Supply
Solapur: आजीसोबतचा प्रवास अखेरचा ठरला! दुचाकी चालवणाऱ्या तरूणीनं ६ वर्षीय चिमुकल्याला चिरडलं, सोलापुरात हळहळ

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी

आज (३१ मे) सकाळपासून मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली आहे. ठाणे रोडवरील गायमुख परिसरात कंटेनरचा अपघात झाल्यामुळे ही कोंडी झाली असल्याचे समजते. या अपघाताचा फटका ठाणे, घोडबंदर आणि वसई रोडमार्गे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com