IAS Transfer: महापालिका निवडणुकीआधीच बड्या IAS अधिकाऱ्याची बदली, अविनाश ढाकणे BMC चे नवे अतिरिक्त आयुक्त

New BMC Additional Commissioner Avinash Dhakne: महापालिका निवडणुकीपूर्वी बड्या आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. अविनाश ढाकणे यांची बीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
IAS Transfer: महापालिका निवडणुकीआधीच बड्या IAS अधिकाऱ्याची बदली, अविनाश ढाकणे BMC चे नवे अतिरिक्त आयुक्त
Avinash Dhakne Appointed New BMC Additional CommissionerSaam Tv
Published On

मुंबई महानगर पालिका निवडणुकीपूर्वी प्रशासनात अनेक बदल सुरू झाले आहेत. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांची अखेर बदली करण्यात आली आहे. अमित सैनी यांच्या जागी आएएस अधिकारी अविनाश ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अविनाश ढाकणे यांनी बदली होताच लगेच डॉ. अमित सैनी यांच्याकडून पदभार स्वीकारावा असे आदेश राज्याचे सह सचिव सुभाष उमराणीकर यांनी दिले आहेत.

मुंबई महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. अभियंत्यांच्या बढती आणि बदलीमुळे ते वादात सापडले होते. त्यांनी केलेल्या बदली आणि बढतींना स्थगिती देखील देण्यात आली होती. या स्थगितीनंतर अमित सैनी यांची बदली होणार अशा जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर त्यांच्या जागी अविनाश ढाकणे यांची वर्णी लागली. सध्या डॉ. अमित सैनी यांची बदली करण्यात आली नसून ते वेटिंगवरच आहेत.

IAS Transfer: महापालिका निवडणुकीआधीच बड्या IAS अधिकाऱ्याची बदली, अविनाश ढाकणे BMC चे नवे अतिरिक्त आयुक्त
Success Story: दिवसा नोकरी अन् रात्री अभ्यास; दोनदा UPSC क्रॅक; IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले; मयंक त्रिपाठी यांचा प्रवास

मुंबई महापालिकेत गेल्या ३ वर्षांपासून प्रशासक राज आहे. यामुळेच मुंबई महापालिकेत गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे. बीएमसीमध्ये बदल्या आणि बढत्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून सावळा गोंधळ सुरु आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पदावर असताना अमित सैनी यांनी १२२ अधिकाऱ्यांच्या आणि ३४ अभियंत्यांच्या बदली केल्या होत्या. तर १०० बदल्या या प्रक्रियेत आहेत. याच्यामुळेच महापालिकेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. अभियंत्यांच्या बदलीबाबत अनियमितता झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व बदली आदेशाला स्थगिती देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले.

IAS Transfer: महापालिका निवडणुकीआधीच बड्या IAS अधिकाऱ्याची बदली, अविनाश ढाकणे BMC चे नवे अतिरिक्त आयुक्त
Success Story: शेतकऱ्याच्या लेकीची कमाल! पहिल्या प्रयत्नात IPS, दुसऱ्या प्रयत्नात IAS अधिकारी, कोमल पुनिया यांचा प्रेरणादायी प्रवास

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अमित सैनी यांनी केलेल्या महापालिकेतील १५६ अभियंत्यांच्या बदलीला पालिका आयुक्तांनी स्थगिती दिली. याच प्रकरणावरून अमित सैनी हे वादात अडकले होते. जूनमध्ये त्यांच्यावर हे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबरमध्ये अमित सैनी यांची बदली करण्यात आली. तेव्हापासून ते वेटिंगवरच आहेत. अद्याप त्यांची बदली झालेली नाही.

IAS Transfer: महापालिका निवडणुकीआधीच बड्या IAS अधिकाऱ्याची बदली, अविनाश ढाकणे BMC चे नवे अतिरिक्त आयुक्त
Car Accident: भरधाव कारवरचा कंट्रोल सुटला, भीषण अपघातात IAS अधिकाऱ्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com