Abhishek Ghosalkar Case: अभिषेक घोसळकरांचा मृत्यू कसा झाला?; पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर

Abhishek Ghosalkar Case : अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी मॉरिसचा पीए मेहुल पारिख, रोहित साहू आणि मॉरिसच्या अंगरक्षकाला ताब्यात घेतलंय. या प्रकरणामागचं नेमकं कारण काय, का याचा मुंबई पोलिसांकडून तपास केला जात आहे.
Abhishek Ghosalkar Case
Abhishek Ghosalkar CaseSaam Tv
Published On

(सचिन गाड, मुंबई)

Abhishek Ghosalkar Postmortem Report:

दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा या स्थानिक गुंड आणि स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. घोसाळकर यांची हत्या केल्यानंतर मॉरिस नोरोन्हाने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. दरम्यान घोसाळकर यांचा मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलाय. यात घोसाळकर यांचा मृत्यू कसा झाला याची धक्कादायक माहिती देण्यात आलीय. (Latest News)

दरम्यान अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी मॉरिसचा पीए मेहुल पारिख, रोहित साहू आणि मॉरिसच्या अंगरक्षकाला ताब्यात घेतलंय. या प्रकरणामागील नेमकं कारण काय, का याचा मुंबई पोलिसांकडून तपास केला जात आहे. घोसाळकर यांना मारल्यानंतर मॉरिसने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या का केली असेल?

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या हत्येप्रकरणात तिसऱ्या व्यक्तीचा समावेश असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. घोसाळकर हत्येच्या प्रकरणानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. घोसाळकर यांच्या हत्येत तिसऱ्या व्यक्तीचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच घोसाळकर यांच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम (Post mortem) रिपोर्ट समोर आलाय.

जे जे रुग्णालयाचा अहवाल गुन्हे शाखेला प्राप्त झालाय. डॉक्टरांच्या पॅनलच्या मार्गदर्शनाखाली पोस्टमार्टम करण्यात आले. गोळी लागून मृत्यू झाल्याने पोस्टमार्टमची संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आली होती. या रिपोर्टमध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू कसा झाला हे स्पष्ट करण्यात आले आहे. पोस्टमार्टमच्या अहवालानुसार, हेमरेज आणि अतिरक्तस्त्रावामुळे अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यू झाला. शविच्छेदन अहवालात स्पष्ट झालंय. तसेच घोसाळकर यांना एकूण ४ गोळ्या लागल्या होत्या. तीन आरपार गेल्या तर एक गोळी शरिरातच मिळाल्याचं अहवालात स्पष्ट झालंय.

..तर अभिषेक घोसाळकर वाचले असते

अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी आयसी कॉलनी परिसरात हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता. या समारंभाला अभिषेक घोसाळकर देखील उपस्थित राहणार होते. घोसाळकर घरातून निघाले आणि मॉरिसने त्यांना फोन केला. हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला नंतर जा, आधी मला भेटायला या असा आग्रह त्याने केला.

मॉरिसच्या आग्रहामुळे घोसाळकर आपल्या पत्नीने आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला न जाता मॉरिसच्या कार्यालयात पोहचले. अभिषेक घोसाळकर जर पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला आधी गेले असते तर त्यांचा जीव वाचला असता.

Abhishek Ghosalkar Case
Abhishek Ghosalkar Death: गोळीबारात ठाकरे गटाच्या अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू, पोलीस उपआयुक्त रोशन यांनी दिली माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com