Mumbai Rain Update: मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला, सखल भागात साचले पाणी; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद

Andheri Subway Closed For Traffic: अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या सबवेखाली देखील पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
Andheri Subway Closed For Traffic
Andheri Subway Closed For TrafficSaam Tv
Published On: 

संजय गडदे, मुंबई

Mumbai Rain News Update (26 July):

मुंबईसह उपनगरामध्ये दुपारपासून मुसळधार पाऊस (Heavy Rainfall In Mumbai) पडत आहे. या पावसामुळे मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. यामुळे वाहतुकीवर देखील परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवेच्या सखल भागामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे अंधेरी सबवे (Andheri Subway) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्याचसोबत मुंबईतील इतर ठिकाणी देखील पावसामुळे वाहतुक कोंडी झाली आहे.

Andheri Subway Closed For Traffic
Mumbai Dam Water Level (26 Jul): गुड न्यूज! मुंबईला पाणीपुरवठा करणारा तिसरा तलाव 'ओव्हरप्लो'; कोणत्या धरणांमध्ये सध्या किती पाणीसाठा?

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तासाभरापासून मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळत आहेय. यामुळे मुंबई उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या सबवेखाली देखील पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी सबवेतून नागरिक आणि वाहनांना ये जा करण्यास मनाई केली आहे.

Andheri Subway Closed For Traffic
Pune Crime News: लग्नाचे वचन देऊन फसवणूक, ३ अल्पवयीन मुलींवर अत्याचार; दोघांना अटक

आज दिवसभरात दुसऱ्यांदा अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. आज सकाळी साधारणपणे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सबवे वाहतुकीसाठी तासाभरासाठी बंद करण्यात आला होता. यानंतर सबवेतील पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली होती.

Andheri Subway Closed For Traffic
Pune Terrorist : दहशतवादी घडवणार होते पुण्यात बॉम्बस्फोट; अटकेत असलेल्या अतिरेक्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड

मात्र दुपारी तीन वाजल्यापासून मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पुन्हा अंधेरी सबवेखाली पुन्हा पाणी साचले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक पोलिसांनी अंधेरी सबवे गेल्या वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. अंधेरी पूर्वेकडे जाण्यासाठी वाहन चालकांनी कॅप्टन गोरे पूल आणि ठाकरे उड्डाणपुलाचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.