
राज्यातील विविध जिल्ह्यांत पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाकडून पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगर, रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आलाय. ठाणे, रत्नागिरी, पुणे, घाट, सातारा, कोल्हापूर या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हवामान विभागाकडून आज पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय. रायगड जिल्ह्यातील अंबा आणि कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय.
चिपळूण- गुहागर मार्गावर रामपूर घाटात दरड कोसळल्याने वाहतूक २ तास बंद झाली. त्यानंतर दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे घर कोसळून ४ नागरिक आणि वीज पडून १ मयत पावले आहेत.
१६ ऑगस्ट
यलो अलर्ट कुठे?
पालघर, नाशिक, नाशिक घाट, धुळे, जळगाव, नंदुरबार, छ. संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा
ऑरेंज अलर्ट कुठे?
ठाणे, रत्नागिरी,पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट
रेड अलर्ट कुठे?
मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड
यलो अलर्ट कुठे?
नाशिक, जळगाव, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा , गोंदिया, गडचिरोली
ऑरेंज अलर्ट कुठे ?
मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट
यलो अलर्ट कुठे?
मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, नाशिक घाट, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार, पुणे, छ. संभाजीनगर , जालना, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रूपर, गडचिरोली, वर्धा
ऑरेंज अलर्ट कुठे?
पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, बीड, लातूर
यलो अलर्ट कुठे?
मुंबई शहर आणि उपनगर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
ऑरेंज अलर्ट कुठे?
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.