

Andheri News: सुंदर दिसण्यासाठी सर्वच मुली आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या क्रीम लावतात. त्यानेही चेहरा चांगला दिसत नसल्यास त्या फेशियल करतात. फेशियल केल्याने चेहऱ्यावर सुंदर ग्लो येतो. मात्र एका तरुणीला हे फेशियल चांगलच महागात पडलं आहे. फेशियल केल्याने तरुणीचा चेहरा भाजला आहे. (Face Burn After Facial)
मिळालेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय तरुणी फेशियलसाठी ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. पण ब्युटी पार्लरवालीने तिचा असा काही फेशियल केला की तिचा चेहराच भाजला. फेशियलसाठी या तरुणीने 17 हजार रुपये मोजले होते. हे प्रकरण पोलिसांत पोहोचलंय आणि गुन्हाही दाखल झालाय.
चेहरा भाजलेली तरुणी अंधेरीतल्या (Andheri) लोखंडवाला परिसरातील रहिवासी आहे. फेशियलसाठी एका ब्युटी पार्लरमध्ये ती पोहोलची. ब्युटी पार्लरवालीने तिच्या चेहऱ्यावर क्रीम लावली. तेव्हा तरुणीची स्कीन जळायला लागली. तरुणीने लगेच डॉक्टरांकडे धाव घेतली.
तरुणीच्या चेहऱ्यावर जळाल्याचे डाग पडले होते. आता हे डाग कधीच जाणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. इतकंच काय, लो क्वालिटीची क्रीम वापरल्याने स्कीन जळाल्याचे डाक्टरांनी म्हटलं.
या प्रकरणी तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनीही या प्रकरणी ब्युटी पार्लरवाल्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करताहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.