Gujarati Name Board: घाटकोपरमध्ये गुजराती पाट्यांची तोडफोड; पाट्या पुन्हा लावा...भाजपची मागणी

Mumbai News: सोमवारी रात्री घाटकोपर पूर्वेकडील आर बी मेहता मार्गवरील गुजराती पाटी असलेल्या चौकाला गुजराती पाटी लावण्यात आली होती.
Gujarati Name Board
Gujarati Name BoardSaam TV
Published On: 

Gujarati Name Board:

मुंबईतील मुलुंडमध्ये काही दिवसांपूर्वी तृप्ती देवरुखकर यांच्या प्रकरणामुळे मराठी गुजराती वाद चांगलाच पेटला. या वादानंतर आता घाटकोपरमध्ये देखील मराठी गुजराती वाद पेटला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच मनसे कार्यकर्त्यांकडून घाटकोपरमध्ये गुजराती फलक तोडण्यास सुरुवात करण्यात आलीये. (Latest Marathi News)

Gujarati Name Board
Pune Crime News: पुण्यातील बुधवारपेठेत अचानक पोलीस धडकले; ७ बांगलादेशी महिलांना अटक

शिवसेना कार्यकर्त्यांनी घाटकोपरमधील एका उद्यानाचा मारो घाटकोपर हा गुजराती बोर्ड आज सकाळी तोडला होता. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी घाटकोपरच्या विविध ठिकाणच्या गुजराती पाट्या तोडल्यात. घाटकोपर पूर्वेकडील आर बी मेहता मार्गावरील चौकाला गुजराती पाटी लावण्यात आली होती. ती पाटी देखील कार्यकर्त्यांनी तोडलीये.

भाजपकडून निषेध

शिवसेना मनसे कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने चौकात तोडफोड केल्याने भाजपने याचा निषेध व्यक्त केलाय. शिवसेना आणि मनसेने ज्या पद्धतीने तोडफोड केलीये ते चुकीचे असल्याचं भाजपनं म्हटलंय. ज्याठिकाणी तोडफोड करण्यात आलीये तेथे जाऊन भाजप कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत चौकातील फलक पुन्हा लावण्यात यावेत अशी मागणी केलीये.

भाजप आमदार प्रविण छेडा यांनी निषेध व्यक्त करत म्हटलं की, गुजरात्यांना टार्गेट केलं जातंय. आर बी मेहता हे कोण होते यांना माहित आहे का? शंभर वर्षांपूर्वीचा इतिहास तोडण्याचा अधिकार कोणाला आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

शिवसेना आणि मनसे हे एकमेकांमध्ये स्पर्धा करतायत. त्या नादात त्यांनी गुजरात्यांना टार्गेट केलंय हे चुकीचं आहे. मुंबईमध्ये सर्व भाषिक लोक राहतात. निवडणुका आल्या म्हणून हे तुम्ही करत आहात का? असा प्रश्नही छेडा यांनी विचारला आहे. आमदार पराग शहा यांनी देखील या प्रकरणी नाराजी व्यक्त केलीये.

Gujarati Name Board
Maharashtra Politics: 'लायकी' शब्दावरून राज्यातलं राजकारण तापलं; राऊतांनी फडणवीसांवर केली टीका, तर भाजपने दिलं प्रत्युत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.