
Pune News : १९६५ आणि १९७१ च्या युद्धामध्ये मोलाची कामगिरी बजावणारे भारतीय वायुसेनेतील ग्रुप कॅप्टन (निवृत्त) दिलीप पारुळकर यांचे आज निधन झाले. भारतीय वायू सेनेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वरून ही माहिती देण्यात आली. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे आज पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी आणि २ मुलं असा परिवार आहे.
भारतीय हवाई दलातील एक धडाडीचे, शूर आणि कर्तृत्ववान अधिकारी म्हणून दिलीप कमलाकर पारुळकर यांची ओळख होती.
पारुळकर हे मार्च १९६३ मध्ये भारतीय हवाई दलात दाखल कार्यरत झाले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी एअर फोर्स अकादमी येथे ‘फ्लाइंग इन्स्ट्रक्टर’ म्हणून काम केलं. तसेच, दोन वर्षे सिंगापूरमध्ये राहून आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवला. सध्या ते नॅशनल डिफेन्स अकादमी येथे ‘बटालियन कमांडर’ या पदावर कार्यरत होते.
१९६५ मध्ये पारुळकर यांच्या विमानावर हल्ला
१९६५ च्या भारत-पाक युद्धादरम्यान, त्यांच्या विमानावर शत्रूंच्या गोळीबाराचा भडिमार झाला. या दरम्यान, त्यांच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना विमानातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला होता, मात्र त्यांनी धैर्य दाखवत गंभीररीत्या नुकसान झालेलं विमान सुरक्षितपणे भारतीय तळावर परत आणलं. या अद्वितीय पराक्रमासाठी त्यांना ‘वायु सेना पदक’ प्रदान करण्यात आलं होतं.
१९७१ मध्ये पारुळकर यांचा पाकिस्तानला चकवा
१९७१ च्या युद्धात नऊ यशस्वी भरारीनंतर दहाव्या भरारीवेळी पाकिस्तानने पारुळकर यांचे विमान लाहोरमध्ये पाडले. यावेळी पाकिस्तानने त्यांना पकडलं आणि रावळपिंडीच्या छावणीत नेलं ज्याठिकाणी त्यांच्यासह १२ वैमानिक होते. १९७२ मध्ये फ्लाइट लेफ्टनंट एम. एस. ग्रेवाल व फ्लाइट लेफ्टनंट हारीश सिंहजी यांच्यासोबत त्यांनी पळ काढला. हा प्रयत्न अत्यंत धोकादायक आणि कठीण परिस्थितीत पार पडला. २०१९ मध्ये "द ग्रेट इंडियन एस्केप" नावाचा चित्रपट हा याच घटनेवर आधारित आहे.
गौरवशाली इतिहासात आणखी एक तेजस्वी पान म्हणजे विंग कमांडर पारुळकर यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल भारत सरकारने त्यांना ‘विशिष्ट सेवा पदक’ जाहीर केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.