Eknath Shinde : वढु ग्रामस्थांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्ण करणार, आज हाेणार माेठी घाेषणा?

Vadhu : छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळाचा विकास यापुर्वी लोकवर्गणीतून झाला. आता राज्य सरकार माध्यमातुन होत आहे असे ग्रामस्थांनी नमूद केले.
government should celebrate chhatrapati sambhaji maharaj death anniversary demands vadhu villagers
government should celebrate chhatrapati sambhaji maharaj death anniversary demands vadhu villagerssaam tv
Published On

Vadhu Tulapur :

छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांचा जन्मोत्सव सोहळ्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज (chhatrapati sambhaji maharaj) यांची पुण्यतिथी शासकीय पातळीवर साजरी व्हावी अशी भावना वढु ग्रामस्थांची आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी आज (शनिवार) करावी अशी माहणी वढु (vadhu tulapur) ग्रामस्थांनी साम टीव्हीशी बाेलताना केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदानस्थळ आणि स्मारकाच्या विस्तारीकरणाचा भुमिपुजन सोहळा आज वढु तुळापुर येथे हाेणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य लाेकप्रतिनिधी येणार आहेत.

government should celebrate chhatrapati sambhaji maharaj death anniversary demands vadhu villagers
Bharadi Devi Anganewadi : आई भराडी देवी शेतकऱ्यांवरील संकट दूर कर : एकनाथ शिंदे (पाहा व्हिडिओ)

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळाचा विकास यापुर्वी लोकवर्गणीतून झाला. आता राज्य सरकार माध्यमातुन होत असल्याचा अभिमान असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या साेहळ्यात स्थानिकांना सहभागी करुन घेतले नसल्याची खंत ग्रामस्थांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली. (Maharashtra News)

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी (Chhatrapati Sambhaji Maharaj Death Anniversary) शासकीय पातळीवर साजरी व्हावी तशी घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी करावी अशी भावना वढु ग्रामस्थांनी साम टीव्हीशी बाेलताना केली आहे.

काेल्हेंच्या मतदारसंघात महायुतीचे नेते

दरम्यान आज महायुतीतले चार प्रमुख नेते खासदार अमाेल कोल्हेंच्या (mp amol kolhe) होमपिच मैदानावर येणार असल्याने शिरुरचा दावेदार कोण अशी चर्चा रंगली आहे. पण ज्यांनी विकास केलाय त्यालाच जनता संधी देणार असे सुताेवाच ग्रामस्थांनी केलेत.

Edited By : Siddharth Latkar

government should celebrate chhatrapati sambhaji maharaj death anniversary demands vadhu villagers
SSC Exam 2024 : दहावीचा पेपर सुरु असताना पाेरं शाळेच्या भितींवर चढली, कॉपी बहाद्दरांना केला पूरवठा; व्हिडिओ 'साम टीव्ही'च्या हाती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com