Breaking News: शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे 'या' तारखेला महाराष्ट्रात येणार

Shivaji Maharaj Wagh Nakh: छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनवरुन परत आणण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे.
Good news Shivaji Maharaj Wagh Nakh will come to Maharashtra from 16 November  2023
Good news Shivaji Maharaj Wagh Nakh will come to Maharashtra from 16 November 2023Saam TV

Shivaji Maharaj Wagh Nakh

महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनवरुन परत आणण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्याच्या १६ तारखेला महाराजांची वाघनखे मुंबईत आणली जाणार आहे. यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्याच लंडनला रवाना होणार आहे.  (Latest Marathi News)

Good news Shivaji Maharaj Wagh Nakh will come to Maharashtra from 16 November  2023
Shivsena Dasara Melava: गेल्यावर्षी आम्ही माघार घेतली, पण यंदा... दसरा मेळाव्यावरुन शिंदे गटाच्या आमदाराचा थेट इशारा

महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. राज्य सरकार ३ ऑक्टोबर रोजी लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयासोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखे भारतात आणण्याबद्दल करार करणार आहे.

या करारानंतर पुढील ३ वर्षांसाठी वाघनखे महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी याच वाघनखाच्या सहायाने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. तिच वाघनखे भारतात आणून येथील जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.

दरम्यान, ही वाघनखे महाराष्ट्रात आणल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सोबत राहतील. महाराष्ट्रात वाघनखे येताच एक मोठा सोहळा आयोजित केला जाणार असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी साम टीव्हीला दिली आहे.

असा असेल वाघनखांचा प्रवास

  • १६ नोव्हेंबरला शिवरायांच्या वाघनखांचे मुंबईत आगमन.

  • १७ नोव्हेंबरला सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात वाघनखांची स्थापना.

  • १७ नोव्हेंबर २०२३ ते २४ ऑगस्ट २०२४ दरम्यान वाघनखे सातारा येथेच प्रदर्शनासाठी ठेवली जातील.

  • १५ ऑगस्ट २०२४ ते एप्रिल २०२५ पर्यंत वाघनखे नागपूर येथील शासकीय संग्रहालयात ठेवली जातील.

  • एप्रिल २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या काळात वाघनखं कोल्हापूर येथील शासकीय संग्रहालयात ठेवली जातील.

  • नोव्हेंबर २०२५ ते नोव्हेंबर २०२६ दरम्यान वाघनखे मुंबईतील छ्त्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवली जातील.

  • १६ नोव्हेंबर २०२६ रोजी वाघनखे पुन्हा लंडनला व्हिक्टोरिया आणि गिल्बर्ट वस्तुसंग्रहालयात पाठवली जातील.

Edited by - Satish Daud

Good news Shivaji Maharaj Wagh Nakh will come to Maharashtra from 16 November  2023
Political News: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची मोठी खेळी; महाराष्ट्रातील ७ आमदारांना खासदारकीचं तिकीट देणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com