Khadakwasla Dam: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! खडकवासला धरण अर्धे भरले, पाणीकपातीचं टेन्शन दूर

Pune Rain: पुण्यात गेल्या ३ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला धरण अर्धे भरले आहे. त्यामुळे पुण्यातील पाणीकपात मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे.
Khadakwasla Dam: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! खडकवासला धरण अर्धे भरले, पाणीकपातीचे टेन्शन दूर
Khadakwasla DamSaam Tv
Published On

अक्षय बडवे, पुणे

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे कारण दोन ते तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसातच खडकवासला धरण ५० टक्के भरले आहे. पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार होती पण आता खडकवासला धरण अर्धे भरल्यामुळे पाणीकपातीचे टेन्शन दूर झाले आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. याच मुसळधार पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण आता अर्धे भरलं आहे. यंदा मान्सून लवकर आल्यामुळे आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मे महिना संपण्यापूर्वीच खडकवासला धरण ४९ टक्के भरल्यामुळे पुणेकरांची चिंता मिटली. एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी कपात करण्यात आली होती. मात्र आता धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे पाणीकपातीचा निर्णय मागे घेतला जाण्याची शक्यता आहे.

Khadakwasla Dam: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! खडकवासला धरण अर्धे भरले, पाणीकपातीचे टेन्शन दूर
Pune Rain: दुष्काळी भागात ढगफुटीसदृश्य पाऊस, भयंकर रौद्रावतार, VIDEO

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर तसेच धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. याचा थेट फायदा पुणे शहराला झाला आहे. कारण पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. एप्रिल मे महिन्यात पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार असताना महापालिकेने शहरातील काही भागांमध्ये पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. मात्र आता हा निर्णय लवकरच बदलला जाण्याची शक्यता आहे.

Khadakwasla Dam: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! खडकवासला धरण अर्धे भरले, पाणीकपातीचे टेन्शन दूर
Pune News: जेजुरीत पावसाची जोरदार हजेरी; पायरी मार्गावरून धबधब्यासारखे पाणी, पाहा व्हिडिओ

पुणे शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस तसेच मान्सूनच्या पहिल्या टप्प्यातील पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी पातळी वाढली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य धरणांपैकी एक असलेल्या खडकवासला धरणात ४८.८६ टक्के इतका पाणीसाठा आहे. म्हणजेच जवळपास हे धरण अर्धे भरले आहे. मान्सून लवकर दाखल झाल्यामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच हे धरण अर्धे भरल्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Khadakwasla Dam: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! खडकवासला धरण अर्धे भरले, पाणीकपातीचे टेन्शन दूर
Pune Rain : ६३ वर्षानंतर पहिल्यांदा १५ दिवस आधी पुण्यात मॉन्सून दाखल; तीन आठवड्यांपासून सुरु आहे मान्सूनपूर्व पाऊस

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा -

खडकवासला धरण - ४८.८६ टक्के

पानशेत धरण - १७.७८ टक्के

वरसगाव धरण- २१.२४ टक्के

टेमघर धरण - ३.८८ टक्के

एकूण धरण पाणी साठा - १९.६४ टक्के टीएमसी

Khadakwasla Dam: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! खडकवासला धरण अर्धे भरले, पाणीकपातीचे टेन्शन दूर
Pune: खेळण्यासाठी घराबाहेर पडला अन् कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com