Pune Rain: पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचे ३ बळी, २ हजार हेक्टर शेतीचे नुकसान; आजही अलर्ट

Pune Rain Alert: पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. या पावसाने तिघांचा बळी घेतला आहे. तर २ हजारांपेक्षा अधिक हेक्टरवरील शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. आजही पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Pune Rain: पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचे ३ बळी, २ हजार हेक्टर शेतीचे नुकसान; आजही अलर्ट
Pune Rain NewsSaam Tv
Published On

अक्षय बडवे, पुणे

पुणे शहरासह जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने तिघांचा जीव घेतला. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस पडतोय. या पावसामुळे मोठे नुकसान झालंय. पावसामुळे घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. पुणे शहरात एकाचा तर जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला.

दौंडमध्ये घराची भिंत पडून महिलेचा मृत्यू झाला. पुण्यातील कर्वेनगर भागात झाड कोसळून एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात मासेमारी करणाऱ्या तरुणाच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. आजही पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. पावसात नागरिकांनी काळजी घ्यावी, धोकादायक ठिकाणी थांबू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पुणे जिल्ह्यात पावसामुळे घरांसोबत शेतीचे देखील मोठं नुकसान झालंय. पुणे जिल्ह्यात पावसामुळे दोन हजार हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले. शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांना फटका बसला. कांदा, आंबा, काजू, केळी, भुईमूग, बाजरी, भाजीपाला पावसामुळे वाहून गेला. काढणीला आलेला कांदा आणि बाजरीलाही फटका बसला.

मे महिन्यात जिल्ह्यात सुमारे अडीच हजार हेक्टरवरील शेतीपिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल प्रशासनाकडून देण्यात आला होता. कृषी आणि महसूल प्रशासनाच्या माहितीनुसार, २०२५ मध्ये पावसामुळे ५९७ गावांतील ७१४६ शेतकऱ्यांचे सुमारे २४१८.५४ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले. जिरायत २५१.०८ हेक्टर, बागायत १८८४.७२ हेक्टर, तर फळपिकांचे सुमारे २०८२.७४ क्षेत्रांवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे

Pune Rain: पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचे ३ बळी, २ हजार हेक्टर शेतीचे नुकसान; आजही अलर्ट
Pune Rain : पुण्यात रस्त्याला नदीचं स्वरुप; चालकाला धाडस नडलं, ट्रॅक्टर पाण्यातून नेला अन्... पाहा थरारक व्हिडीओ

पुणे शहरात सोमवारी पावसाची संतधार पाहायला मिळाली. जिल्ह्यात पावसाचा जोर अंशतः ओसरला मात्र शहरात पावसाची रिपरिप सुरूच होती. पुण्याला काल ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे शहरातील उपनगर आणि मध्यवर्ती भागात पावसाच्या सरी बरसल्या. पुणे शहरात आज ही पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. सोमवारी कुठेकुठे किती पाऊस पडला याची आकडेवारी हवामान विभागाकडून जारी करण्यात आली आहे.

Pune Rain: पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचे ३ बळी, २ हजार हेक्टर शेतीचे नुकसान; आजही अलर्ट
Pune Rain: दुष्काळी भागात ढगफुटीसदृश्य पाऊस, भयंकर रौद्रावतार, VIDEO

पुण्यात कुठे किती पाऊस?

वडगावशेरी – ४२.० मिमी

दुधूळगाव – ३८.५ मिमी

पाषाण – ३७.५ मिमी

तळेगाव – ३२.५ मिमी

निमगिरी – ३०.० मिमी

धामधरे – २९.५ मिमी

माळीन – २९.० मिमी

राजगुरुनगर – २६.५ मिमी

नारायणगाव – २३.५ मिमी

चिंचवड – २३.५ मिमी

हवेली – १९.५ मिमी

गिरीवन – १६.० मिमी

मगरपट्टा – १४.५ मिमी

हडपसर – १४.० मिमी

बारामती – ११.० मिमी

दापोडी – ८.५ मिमी

लवासा – ७.५ मिमी

भोर – ७.५ मिमी

लोणावळा – ६.० मिमी

कोरेगाव पार्क – ४.० मिमी

दौंड – ३.५ मिमी

पुरंदर – ०.५ मिमी

Pune Rain: पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचे ३ बळी, २ हजार हेक्टर शेतीचे नुकसान; आजही अलर्ट
Pune Rain : पुण्यात पावसाचा पहिला बळी, अंगावर भिंत पडल्याने ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com