Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप, ठाकरेंचे खासदार आणि आमदार महायुतीच्या संपर्कात? भाजपच्या संकटमोचकाचा दावा

Girish mahajan News : ठाकरेंचे खासदार आणि आमदार महायुतीच्या संपर्कात असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. महाजन यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
girish mahajan News
girish mahajan Saam tv
Published On

ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्याचं राजकीय समीकरण बदलल्याची चर्चा होत असताना भाजप नेत्याने ठाकरे गटाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. या आमदार आणि खासदारांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जराही विश्वास नाही, असं म्हणत गिरीश महाजन यांनी ठाकरेंना पलटीबहाद्दर म्हटलं.

मीडिया रिपोर्टनुसार, मराठी भाषेच्या मुद्द्यावरून शनिवारी राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच व्यासपीठावर येत सरकारवर टीकेचे बाण सोडले. ठाकरे बंधूंच्या टीकेनंतर भाजपकडूनही पलटवार सुरू झाला आहे. महाजन यांनी ठाकरेंवर टीका करताना म्हटलं की, 'त्यांची भूमिका अपरिपक्व असते. ठाकरेंचे अनेक खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात आहेत. माझ्यावर विश्वास नसेल, तर तुम्हाला लवकरच सत्य समजेल. ठाकरेंच्या खासदार आणि आमदारांना त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. मुख्यमंत्री होण्यासाठी वडील बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा विसरले. त्यामुळे राजकीय भविष्य बरबाद केलं'.

girish mahajan News
Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

महाजन यांनी ठाकरेंवर टीका करताना म्हटलं की, 'पहिलीपासून हिंदी सक्ती लागू करण्याचा निर्णयाचा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारच्या काळात पारित झाला. कॅबिनेटच्या प्रस्तावावर त्यांची सही आहे. आता तेच त्यांच्या निर्णयाला विरोध करत आहेत. त्यांनी स्वत:च्या निर्णयावरून यू-टर्न घेतला आहे. ठाकरे फक्त विरोधाला विरोध करत आहेत'. महाजन यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहावे लागेल.

girish mahajan News
Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताना म्हटलं की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना डॉ. रघुनाथ माशेलकर समितीच्या शिफारशीनंतर १ ते १२ वी इयत्तापर्यंत त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय स्वीकारला होता'. मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेला आरोप फेटाळून लावत ठाकरेंनी म्हटलं होतं की, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या शिफारसीनंतर एक अभ्यास समितीची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या समितीची एकही बैठक झाली नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com