Ghatkopar Hoarding Collapse: ६० तासानंतर घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य पूर्ण; १६ जणांचा मृत्यू ७५ जखमी, मुंबई महापालिकेची माहिती

Ghatkopar Hoarding Collapse Incident Update: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मोठी अपडेट समोर येत आहे. घटनास्थळी बचावकार्य पूर्ण झाल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्तांनी दिली आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना
Ghatkopar Hoarding CollapseSaam Tv
Published On

सचिन गाड, साम टीव्ही मुंबई

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मोठी अपडेट समोर येत आहे. घटनास्थळी बचावकार्य पूर्ण झाल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्तांनी दिली आहे. तर ढिगाऱ्याखाली आत्ता कोणीही अडकलं नसल्याचा खुलासा पालिकेने केलं आहे. आता केवळ मलाबा हटवण्यचाचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू तर ७५ जण जखमी झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील ढिगाऱ्याखाली आत्ता कोणीही अडकलेलं नाही, अशी महत्त्वपूर्ण माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे. होर्डिंग दुर्घटनेनंतर सलग दोन दिवस घटनास्थळी बचाव कार्य सुरू (Mumbai News) होतं. घाटकोपरमधील छेडानगर परिसरात होर्डिंग कोसळून १३ मे रोजी दुर्घटना घडली होती. वाऱ्याच्या वेगामध्ये हे बचावकार्य पार पडलं आहे. परंतु या दुर्घटनेमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील (Ghatkopar Hoarding Collapse) बचावकार्य तब्बल ६० तासांनंतर पूर्ण झालं आहे, अशी माहिती मुंबई पालिका आयुक्तांनी दिली आहे. १३ मे रोजी दुपारी चार वाजता पेट्रोल पंपावरील होर्डिंग कोसळलं होतं. त्यानंतर अनेकजण या होर्डिंगखाली दबले गेले होते. आज हे बचावकार्य पूर्ण झालं आहे.

मागील तीन दिवसांपासून घटनास्थळी एनडीआरएफ टीम, सेन्सर आणि श्वानपथकाच्या साहाय्याने या होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली कोणी अडकलं आहे का? याचा शोध घेतला जात होता. अखेर या दुर्घटनेतील बचावकार्य पूर्ण झाल्याची माहिती मुंबई महापालिकेनं (Mumbai Municipal Commissioner) दिली आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना
Ghatkopar Hoarding Case: होर्डिंग दुर्घटनेला ५० तास उलटून गेले, बचावकार्य सुरूच, मृतांचा आकडा १७ वर, जोडपं अजूनही सांगाड्याखालीच

या बचावकार्यामध्ये मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका, एनडीआरएफ, एमएमआरडीए, महानगर गॅस या यंत्रणांनी बचावकार्य करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. घटनास्थळी आता संपुर्ण तपासणी करण्यात आलीय. यामध्ये आता अन्य कोणतीही व्यक्ती अडकली नसल्याची माहिती समोर येत आहे. आता फक्त होर्डिंगचा मलबा हटवण्याचं काम घटनास्थळी सुरू (Mumbai Accident News) आहे.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुंटुबीयांना त्वरित प्रत्येकी पाच लाखाची मदत देण्यात येणार आहे. या दुर्घटनेनंतर राज्यातील अनेक शहरं अलर्ट मोडवर आली आहे. अनधिकृत होर्डिंग हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. होर्डिंग लावताना आवश्यक परवानगी घेणं गरजेचं असल्याचं मुंबई महापालिका आयुक्तांनी सांगितलं आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना
Ghatkopar Hoarding Collapse: आरोपी भावेश भिंडेंच्या वार्षिक कमाईची माहिती आली समोर, पुणे महापालिकाही अलर्ट मोडवर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com