Badlapur News: बदलापूरच्या जांबळाना भौगोलिक मानांकन; देशातील पहिले शहर होण्याचा मान

Jawa Plum : महाराष्ट्रात कोकणातील आंबा, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री अशी ओळख आहे. यानंतर आता बदलापूर हे शहर जांभळाचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे.
Badlapur News
Badlapur NewsSaam Tv
Published On

Badlapur Java Plum Geographical Indication:

भारतात अनेक राज्यांची, शहराची ओळख वेगवेगळी आहे. काही शहरांची ओळख ही त्या शहरात घेतली जाणाऱ्या पीकांवर देखील आहे. अशीच ओळख महाराष्ट्रातील शहरांची आहे. महाराष्ट्रात कोकणातील आंबा, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री अशी ओळख आहे. यानंतर आता बदलापूर हे शहर जांभळाचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे.

कृषी उत्पादनात भौगोलिक निर्देशांक हे बदलापुरात उत्पादन घेतलेल्या जांभळांना मिळाले आहे. बदलापूर आता जांभळाचे शहर म्हणून नावारुपाला येणार आहे. जांभूळ हे फळ खाण्यासाठी चवदार असेत. त्याच्या गोड आंबट चवीमुळे त्याची बाजारात मागणी असते. बदलापुरातील जांबळे हे मुंबई, उपनगर तसेच अनेक शहरांत लोकप्रिय आहेत. त्यामुळे बदलापूरमधील जांभळांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. विशेष म्हणजे, स्वातंत्र्यानंतर ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच भौगोलिक मानांकन मिळाले आहे.

बदलापूरातील जांभळांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, असे एका संशोधनातून समोर आले आहे. इतर जांभळापेक्षा बदलापूरातील जांभूळ हे विशिष्ट आकारात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जाभळांना भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. या प्रयत्नांना यश आले आहे. ही माहिती चैन्नईतील भौगोलिक मानांकन रजिस्ट्रीमधून मिळाली आहे. याची सरकारी गॅझेटमध्ये नोंद करण्याची प्रोसेस सुरु आहे.

Badlapur News
Yavatmal Farmers Protest: पीक विम्याची रक्कम मिळाली...३५, ५०, ९० रुपये, थेट तिजोरीसह शेतकरी धडकले पोलीस अधीक्षक कार्यालयावर

बदलापूर शहरातील जवळपास २० गावांतील १२०० झाडे शोधून त्या माहितीच्या आधारे हा डेटा गोळा करण्यात आला आहे. बदलापूर हे भौगोलिक मानांकन प्राप्त होणारे देशातील पहिले शहर आहे.

Badlapur News
Sudhir Mungantiwar News : मराठा आरक्षण देण्याची सरकारची भुमिका संदेह कोणी घेऊ नये; मंत्री सुधीर मुनगंटीवार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com