Yavatmal Farmers Protest: पीक विम्याची रक्कम मिळाली...३५, ५०, ९० रुपये, थेट तिजोरीसह शेतकरी धडकले पोलीस अधीक्षक कार्यालयावर

Yavatmal Farmers Protest: अतिवृष्टीमुळे यावर्षी खरीप हंगामात कापूस, तुर, सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. असे असतांना पीक विमा कंपण्यांनी मात्र शेतकऱ्यांना ३५, ५० आणि ९० रुपये नुकसान भरपाई देऊन जखमेवर मीठ चोळले आहे.
Yavatmal Farmers Protest
Yavatmal Farmers ProtestSaam Digital
Published On

संजय राठोड

Yavatmal Farmers Protest

अतिवृष्टीमुळे यावर्षी खरीप हंगामात कापूस, तुर, सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. असे असतांना पीक विमा कंपण्यांनी मात्र शेतकऱ्यांना ५०, ५० आणि ९० रुपये नुकसान भरपाई देऊन जखमेवर मीठ चोळले आहे. याकडे सरकारने सुध्दा दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करून राग व्यक्त केला आहे. थेट तिजोरीसह शेतकरी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकले आणि त्यांनी विम्याच्या रकमेसाठी सशस्त्र संरक्षण देण्याची मागणी केली. या आंदोलनाने आज यवतमाळकरांचे लक्ष वेधून घेतले. शेतकरी नेते देवानंद पवार यांच्या नेत्रृत्वात हे आंदोलन करण्यात आले. पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांनी यासंदर्भात निवेदन दिले आहे.

या वर्षीच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकाकरिता केंद्र व राज्य सरकारच्या मेहरबानीने विमा कंपनीने मला ५२ रुपये ९९ पैसे इतक्या रक्कमेचा भरीव पीकविमा मंजुर केला आहे. यामुळे मी खूप आनंदीत झालो आहे. सदरची रक्कम माझ्या सारख्या एका गरीब शेतकऱ्यासाठी ५० खोक्यापेक्षाही मोठी असल्याने या रक्कमेच्या सुरक्षेची मला फारच काळजी लागली आहे. शिवाय बँकेतून ही रक्कम पिशवी अथवा सुटकेसमधून नेणे शक्य नसल्याने रक्कम नेण्यासाठी मी वडिलोपार्जित तिजोरी व बैलबंडी आणली आहे. रुपये ५२.९९ इतक्या मोठ्या रक्कमेने भरलेली तिजोरी बैलगाडीवरून नेतांना रस्त्यात लुटमार होण्याची किंवा दरोडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. साऱ्या जगाची व चोरट्यांची नजर माझ्या पीकविम्याच्या रुपये ५२.९९ कडे लागली आहे. माझ्यासाठी ही रक्कम अतिशय महत्त्वाची आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सीबीलच्या अटीमुळे बँकेचे पीककर्ज न मिळाल्याने सावकाराकडून दिडीतिडीने घेतलेले कर्ज पिकविम्याच्या या पैश्यातून सर्वप्रथम फेडीन. उभ्या पिकांची नासाडी करणाऱ्या जंगली प्राण्यांचा व डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेताला तारेचे कुंपण करीन. तब्येत बरी नसतांनाही शेतात रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या माझ्या बायकोला दवाखान्यात नेईन. गेल्या अनेक महिन्यांपासून फाटक्या कपडे घालून शाळेत जाणाऱ्या पोराला कपडे घेईन. वयात आलेल्या मुलीचे धुमधडाक्यात लग्न करीन.

Yavatmal Farmers Protest
Nandurbar: लोकप्रतिनिधी फक्त मतदान मागण्यासाठी येतात ! रस्ते, पाणी, घरकुलापासून शिव पाड्यातील ग्रामस्थ वंचित

तसेच पूर्ण कुटुंबासह एकदा गुवाहाटीला पर्यटनासाठी जाऊन येईल. संकटग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आयुष्यात भरभराटी निर्माण करणाऱ्या देशी - विदेशी महागड्या गाड्यांच्या प्रदर्शनासाठी पालकमंत्री ना. संजय राठोड यांना भरीव आर्थिक देणगी देईन. उरलीसुरली रक्कम तिजोरी सांभाळून ठेवीन. म्हणून पीकविम्याची ही मदत माझ्या व माझ्या कुटुंबासाठी खुपचं महत्वाची आहे. मात्र, एवढी मोठी रक्कम घरी नेतांना रस्त्यात लुटमारीची प्रचंड भीती वाटत असल्याने आपण मला पीकविमा रक्कमेच्या सुरक्षेसाठी किमान सहा सशस्त्र पोलीस पुरवावे, अशी मागणी शेतकऱ्याने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. शेतकऱ्यांनी या मागणीच्या माध्यमातून सरकारला फटकारले असून आपला संताप व्यक्त केला आहे. आज दुपारी 12 च्या दरम्यान शेतकऱ्यांनी वाजत गाजत लोखंडी तिजोरी नेऊन पोलीस अधिक्षकांना संरक्षणासाठी अर्ज सादर केले.

Yavatmal Farmers Protest
Beed News : दुध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक; रस्त्यावर दूध ओतून बीड- परळी महामार्ग अडवला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com