Pratap Sarnaik: मुख्यमंत्र्यांनी मला 900 खोके दिले; पण कशासाठी? प्रताप सरनाईकांनी सविस्तर सांगितलं

या निधीमुळे रस्ते, सुशोभिकरण, पाड्यांचा विकास तसेच जनहिताची कामे होणार आहेत.
Pratap Sarnaik
Pratap SarnaikSaam Tv
Published On

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन गट सध्या शिवसेनेत आहेत. मात्र शिंदे गटातील आमदारांवर 50 खोके घेतल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात आहे. शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला 50 नाहीतर 900 खोके दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कुणी 25 खोके म्हणतंय तर कुणी 50 खोके म्हणतंय, पण मला मुख्यमंत्र्यांनी 900 खोके दिले आहेत. 900 खोक्यांचा निथी त्यांनी विकासकामांसाठी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी 900 कोटी ठाणे महापालिका आणि 900 कोटी मीरा भाईंदर महापालिकेच्या विकासकामांसाठी असे 1800 कोटी रुपये दिले आहेत. या निधीमुळे रस्ते, सुशोभिकरण, पाड्यांचा विकास तसेच जनहिताची कामे होणार आहेत. या दोन्ही महापालिकांमधील विकासकामांसाठी याचा मोठा फायदा होणार आहे, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Pratap Sarnaik
शिंदे सरकारचं अखेर ठरलं! कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार?

शिंदे गटातील आमदार येत्या 26 तारखेला गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनसाठी जाणार आहेत. देवीकडे घातलेले साकडं पूर्ण झाल्यानं देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं. 27 तारखेला अनेक लग्न असल्यामुळे 26 तारखेलाच जाण्यासाठी सर्व आमदार आग्रही आहेत, असं सरनाईक यांनी सांगितलं.

राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत

मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि त्यात कुणाला मंत्री आणि पालकमंत्री पद मिळेल, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. मात्र मंत्रिपद महत्वाचे नसून विकासकामे होत आहे हे महत्वाचे आहे, असंही प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, असं सरनाईक यांनी म्हटलं. शिंदे-फडणवीस सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुढील 10 वर्षे सत्तेवर राहील असा दावाही त्यांनी केला.

Pratap Sarnaik
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्यासाठी कोर्टात याचिका, शांतता बिघडवल्याचा याचिकेत आरोप

ईडी कारवाईची प्रक्रिया कुणीही थांबवू शकत नाही

भाजपसोबत गेल्याने ईडी कारवाई थांबली असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. मात्र ईडी कारवाईची प्रक्रिया मुख्यमंत्री किंवा कोणताही नेता थांबवू शकत नाही. माझ्यावर दोन वर्षांपूर्वी ईडीची कारवाई झाली होती. ईडीचा जो निर्णय जो आहे, तो न्यायालयातून आलेला असून ही प्रक्रिया जुनी आहे. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ठ असल्याचंही प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com