मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनं केली आहेत. आता राज्यपालांना पदावरून हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
दीपक दिलीप जगदेव यांच्या वतीने अॅड नितीन सातपुते यांनी ही याचिका दाखल केली आहे. विद्यमान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी जनतेतील एकोपा आणि शांतता बिघडवल्याचा याचिकेत आरोप करण्यता आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 61 आणि 156 अंतर्गत राज्यपालांविरोधात महाभियोगाची कार्यवाही करावी. याबाबत उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
कलम 61 आणि 156 अंतर्गत राज्यपालांना हटवण्याचा निर्णय घेण्याची या याचिकेत मागणी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचा राज्यपालांनी अवमान केल्याचा याचिकेत ठपका ठेवण्यात आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कलम 19 अंतर्गत बंधने काय? हे देखील याचिकेत अधोरेखित करण्यात आलं आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
येत्या 24, 25 नोव्हेंबरला राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर
राज्यात सुरु असलेल्या गदारोळादरम्यान राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 24, 25 नोव्हेंबर असा 2 दिवस राज्यपालांचा हा दौरा असेल. उत्तर भारतात राज्यपाल कोश्यारी यांचे नियोजित कार्यक्रम आहेत. मात्र वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर असल्याने विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजपटे वरिष्ठ नेते राज्यपालांची कानउघाडणी करणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.