शिंदे सरकारचं अखेर ठरलं! कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार?

शिंदे गटाचे आमदार आणि खासदार कामाख्या देवीचे दर्शन घेऊन आल्यानंतर राज्यात शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Eknath Shinde Devendra Fadnavis
Eknath Shinde Devendra Fadnavis saam tv

Eknath Shinde Government News : शिंदे गट पुन्हा एकदा गुवाहाटीचा दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यादरम्यान शिंदे गटाचे आमदार आणि खासदार कामाख्या देवीचे दर्शन घेऊन आल्यानंतर राज्यात शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde Devendra Fadnavis
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्यासाठी कोर्टात याचिका, शांतता बिघडवल्याचा याचिकेत आरोप

शिंदे सरकारमधील काही आमदार मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे नाराज आमदार सरकारमधून बाहेर पडणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. त्या चर्चेवरून राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार अशी विधान अनेक राजकीय नेत्यांनी केली. त्यानंतर आता शिंदे सरकारने नाराज आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Eknath Shinde Devendra Fadnavis
Video : गांधींच्या हत्येसाठी माजी काँग्रेस मंत्र्यांच्या मेव्हण्याने पिस्तुल पुरवले; रणजित सावरकर यांचा खळबळजनक आरोप

शिंदे गट २६ नोव्हेंबर रोजी त्यांच्या आमदार आणि खासदारांसह पुन्हा गुवाहाटीचा दौरा करणार आहे. या गुवाहाटी दौऱ्यात शिंदे गटाचे आमदार आणि खासदार हे कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहे. कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. गुवाहाटीतून आल्यावर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com