

कल्याण जवळील मोहने येथे हजारो गॅस ग्राहक वेठीस
ग्राहकांना कोणतीही कल्पना न देता कनेक्शन दुसऱ्या एजन्सीत वर्ग
गॅस एजन्सीमधील कर्मचाऱ्यांचे ग्राहकांशी उद्धट वर्तन
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण: देशभरात एकीकडे सिलिंडरचे टंचाई निर्माण झाल्याचे चित्र असताना कल्याण जवळील मोहनी येथे एका गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. मोहने परिसरातील हजारो ग्राहक परस्पर कोणतेही कल्पना न देता याच परिसरातील दुसऱ्या एजन्सीमध्ये वर्ग करण्यात आल्याने हे ग्राहक सिलिंडरपासून वंचित राहिले आहेत .
न्यू रिलॅक्स एजन्सीमधून या ग्राहकांना द नाराकार कॉपरेटिव्ह कंजूमर सोसायटी या एजन्सीमध्ये वर्ग करण्यात आले आहे. महिनाभरापासून गॅस सिलिंडरचे बुकिंग केलेली असताना आता एजन्सी बदलल्याने पुन्हा नव्याने बुकिंग करावी लागते. त्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केला. इतकेच नव्हे तर एका वृद्ध आजीकडे सिलिंडरसाठी पैसे मागितले तर देखील आरोप करण्यात आले.
सिलिंडर बुकिंग करून सिलिंडरच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो ग्राहकांची एजन्सी एका दिवसात बदलल्याने ग्राहकांचे मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. आमची एजन्सी कोणाला विचारून बदलले आम्हाला याबाबत कोणतेही पूर्वकल्पना दिली नाही. आधीच आम्ही महिनाभरापासून बुकिंग करून सिलिंडरची वाट बघतोय, त्यात आता पुन्हा नव्याने बुकिंग करायला सांगतात. एजन्सीकडून आम्हाला वेटेज धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे ब्लॅकने सिलिंडर घ्या, असं सांगितल्याचे देखील आरोप करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच ग्राहकांसह शिवसेना नगरसेवक रोहनकोट यांनी घटनास्थळी धाव घेतली. एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. मात्र यावेळी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशीच उद्धटपणे वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तर दुसरीकडे शिवसेना नगरसेवक रोहनकोट यांनी देखील या एजन्सीमधील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. तसेच ग्राहकांना जर सिलिंडर वेळेवर मिळाला नाही, तर शिवसेना स्टाइलने आंदोलन करू, असा इशारा देखील रोहन कोट यांनी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.