Kalyan Crime News: कल्याणमध्ये गुंडांची दहशत, वर्चस्वाच्या वादातून एकाची निर्घृण हत्या

Kalyan Gangster Killed Case: कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात (Kolasewadi Area) ही घटना घडली आहे.
Kalyan Gangster Killed Case
Kalyan Gangster Killed CaseSaam Tv News
Published On: 

अभिजित देशमुख, कल्याण

Kalyan News: कल्याणमध्ये गुन्हेगारीच्या (Kalyan Crime) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अपघात, हत्या, हाणामारी अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. अशामध्ये कल्याणमध्ये पुन्हा एकदा हत्येची घटना समोर आली आहे. वर्चस्वातून एका गुंडाची चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे. कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात (Kolasewadi Area) ही घटना घडली आहे.

Kalyan Gangster Killed Case
Biparjoy Cyclone at Pakistan: पाकिस्तानात बिपरजॉय चक्रीवादळाचे थैमान; 34 जणांचा मृत्यू, 145 जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात रविवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. भाईगिरीच्या वर्चस्वातून एका तरुणाची चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे. अमोल लोखंडे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अमोल हा देखील सराईत गुन्हेगार आहे. हे दोघेही कल्याण कोळसेवाडी परिसरात राहतात. दोघांची या परिसरात दहशत होती. वर्चस्वाच्या वादातून अमोलची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

Kalyan Gangster Killed Case
Konkan Biparjoy Effect: कोकणात समुद्र खवळला, अजस्त्र लाटांचं तांडव; समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद

कोळसेवाडी परिसरात भाईगिरीच्या वर्चस्वातून दोघांमध्ये याआधी देखील अनेकदा वाद झाले होते. याच वादातून जयेश डोईफोडेने रविवारी रात्रीच्या सुमारास याच परिसरात भर रस्त्यात अमोलला गाठले आणि त्याच्यावर चाकूने वार करत हत्या केली. दुर्गा मंदिर रोडवर ही घटना घडली. या झटापटीत जयेश डोईफोडे देखील जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जयेश डोईफोडेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जयेश डोईफोडे हा देखील सराईत गुन्हेगार आहे.

या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. मयत अमोल लोखंडे हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात सहा ते सात गुन्हे दाखल असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांनी दिली आहे. तर जयेश डोईफोडे हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. भाईगिरीच्या वर्चस्वातून झालेल्या हत्येनंतर कल्याण पूर्व परिसरात दहशत पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.