गाडीचं तिकीट मिळालं नाही? चिंता सोडा! कोकणात जाणाऱ्यांसाठी ३४ स्पेशल गाड्या; वेळापत्रक पाहाच

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठा दिलासा! मध्य रेल्वे ३४ विशेष गाड्या चालवणार आहे. LTT-मडगाव आणि पनवेल-चिपळूण ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक पाहा.
Bandra- Madgaon Express:
Bandra- Madgaon ExpressSaam Tv
Published On

Ganeshotsav 2026 special trains to Konkan : आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तुफान गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून मध्य रेल्वेने कोकणासाठी अतिरिक्त ३४ गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते मडगाव दरम्यान ४ आरक्षित विशेष गाड्या आणि पनवेल ते चिपळूण दरम्यान ३० अनारक्षित (Unreserved) मेमू (MEMU) गाड्यांचा समावेश आहे. यामुळे गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे.

Bandra- Madgaon Express:
Society Rules : घराबाहेर, लिफ्टसमोर चपलांचा रॅक ठेवणे पडेल महाग! सोसायट्यांचा कडक नियम; पाहा काय सांगतो कायदा!

लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष ट्रेन (४ फेऱ्या)

गाडी क्रमांक ०१००३ (LTT ते मडगाव):

ही विशेष गाडी दिनांक १६ सप्टेंबर २०२६ आणि १९ सप्टेंबर २०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सकाळी ०७.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २३.४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. (एकूण २ फेऱ्या)

गाडी क्रमांक ०१००४ (मडगाव ते LTT):

ही गाडी दिनांक १५ सप्टेंबर २०२६ आणि १८ सप्टेंबर २०२६ रोजी मडगाव येथून सायंकाळी १६.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (एकूण २ फेऱ्या)

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी.

Bandra- Madgaon Express:
जमीन खरेदी-विक्रीचा नवा नियम, आता गुंठ्यांत जमीन घेण्यापूर्वी हे वाचाच, अन्यथा व्यवहार ठरेल बेकायदेशीर

पनवेल - चिपळूण - पनवेल मेमू अनारक्षित विशेष ट्रेन (३० फेऱ्या)

गाडी क्रमांक ०११५९ (पनवेल ते चिपळूण):

ही मेमू अनारक्षित विशेष ट्रेन दिनांक १० ते १४ सप्टेंबर २०२६ आणि १८ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पनवेल येथून दुपारी १५.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२.२० वाजता चिपळूण येथे पोहोचेल. (एकूण १५ फेऱ्या)

गाडी क्रमांक ०११६० (चिपळूण ते पनवेल):

ही ट्रेन १० ते १४ सप्टेंबर २०२६ आणि १८ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान चिपळूण येथून सकाळी ०९.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १४.३० वाजता पनवेलला पोहोचेल. (एकूण १५ फेऱ्या)

ही मेमू सेवा दिनांक १५, १६ आणि १७ सप्टेंबर २०२६ या ३ दिवसांच्या कालावधीत चालवली जाणार नाही, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.

थांबे: पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनि.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com