कल्याण/डोंबिवली : दिव्यात राहणाऱ्या बहुसंख्य कोकणी बांधवांना गणेशोत्सवासाठी दिवस स्थानकावरून कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली होती. याच मागणीला मध्य रेल्वे चे महाप्रबंधक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून गणपती उत्सवासाठी दिव्या मधून देखील विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. (MNS Raju Patil Todays News)
गणेशोत्सवासाठी ठाणे जिल्ह्यातील दिवा, कल्याण, डोंबिवली अंबरनाथ उल्हासनगर व परिसरात मोठ्या प्रमाणात कोकणवासीय वास्तव्याला आहेत. दरवर्षी मोठ्या संख्येने कोकणवासीय गणेशोत्सवासाठी कोकणात जात असतात. या जनतेसाठी विशेष दिव्या मधून गाड्या सोडण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली होती.
यानंतर रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी दिवा रोहा चिपळूण पर्यंत एक गाडी वाढवण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. २५ ऑगस्ट रोजी गणपती विशेष गाडी ०११७१ ला दिवा येथे थांबा देण्यात आला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांच्या मागणीनुसार या ट्रेनमध्ये चार जीएस दिवा विभागासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. (Kokan Ganesh Festival Special Trains)
शिवाय सावंतवाडी दिवा ते सावंतवाडी अशी रोजची सेवा सुरू आहे. तर ट्रेन क्रमांक १०१०५ दिवा स्टेशन वरून सकाळी ६:२५ वाजता सुटणार असून ती सावंतवाडी येथे १८:३० वाजता पोहचणार आहे.तर या विशेष गाडीचा परतीचा वेळ सावंतवाडी येथून २०:१० वाजता सूर होणार असून दिवा येथे ०८:२५ आगमन होणार आहे.
कोकणवासीयांसाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्र शासनाशी पाठपुरावा करून सुरू केलेल्या या विशेष गाडी मुळे परिसरातील कोकणवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणपती उत्सवासाठी गाडी क्रमांक ६१०११ दिवा रोहा चिपळूणपर्यंत वाढवण्यात आली आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.