Kalyan News : महापालिका निवडणूकीपूर्वी मनसेत फेरबदल; कल्याणचे तिसरे पाटील राजकीय मैदानात

मनसे आमदार राजू पाटील यांच्या लहान भावाची राजकारणात एन्ट्री झाली
MNS Kalyan News
MNS Kalyan NewsSaam TV
Published On

डोंबिवली : डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात मनसेच्या पदाधिकारांच्या निवडीत फेरबदल केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारणी जाहीर झाली आहे. यात मनसे आमदार राजू पाटील यांच्या लहान भावाची राजकारणात एन्ट्री झाली असून त्यांनाही पद देण्यात आले. त्यामुळेच पाटील कुटुंबातील तिसऱ्या भावाची राजकरणात एन्ट्री झाली आहे. तर कार्यकारणीमध्ये नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

MNS Kalyan News
Maharashtra Politics : मुंबई महापालिका निवडणूक 'मविआ' एकत्र लढणार?; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

कल्याण ग्रामीण भागातील टेनिस क्रिकेटचा वर्ल्डकप आयोजनात पाटील कुटुंबाचा मोठा पाठबळ राहिला आहे. यामध्ये प्रमुख्याने ग्रामीण भागातील तरुणांना एकत्रित करण्यात माजी आमदार पाटील कुटुंबातील विनोद पाटील यांचा सर्वाधिक दबदबा राहिला आहे. ग्रामीण भागातील तरुणांच्या क्रीडा क्षेत्रात सर्वाधिक मदतीचा हात म्हणून विनोद पाटील यांच्याकडे पहिले जात होते.

ग्रामीण भागातील कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नसलेल्या विनोद पाटील यांच्या होर्डिंगवर फोटो काही दिवसांपासून झळकत असल्याने सर्वाधिक चर्चा होत होती. अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या कल्याण ग्रामीण भागातील पदाधिकारी घोषणेत विनोद पाटील यांच्याकडे कल्याण ग्रामीण विधानसभेचे अध्यक्ष पद दिले आहे. त्यामुळे आता कल्याण ग्रामीण भागातील तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून विनोद पाटील यांच्याकडे पहिले जाते.

MNS Kalyan News
Uddhav Thackeray : हे तर खोके सरकार; 'मविआ'च्या बैठकीत ठाकरे काय म्हणाले? वाचा...

आमदार राजू पाटील यांना निवडून आणण्यात मोठा हाथ

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी मनसेकडून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघा साठी राजू पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आलं. मात्र आमदार पाटील हे आपल्या कामानिमित्त परदेशात होते. मात्र या निवडणुकीच्या कालखंडात अगदी काही वेळ असताना देखील विनोद पाटील यांनी ग्रामीण भागातील तरुणाई एकत्रित करून आमदार राजू पाटील यांना निवडून आणले होते.

ग्रामीण भागात पक्षाची सर्वाधिक बांधणी नसताना देखील आमदार राजू पाटील यांना निवडून आणण्यात विनोद पाटील यांचा मोठा वाटला होता.त्यामुळे विनोद पाटील यांच्या खांद्यावर ग्रामीण विधानसभा अध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com