टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी जी.ए सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशनचाही सहभाग
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी जी.ए सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशनचाही सहभागSaam TV News

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी जी.ए सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशनचाही सहभाग

सल्लागार अभिषेक सावरीकर, डॉ. प्रीतीश देशमुख आणि सौरभ त्रिपाठी यांच्यात टीईटी परीक्षेमध्ये अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्याबाबत डिसेंबर २०१७ मध्ये दिल्लीत झाली होती बैठक
Published on

पुणे - आरोग्य, म्हाडा आणि टीईटी परीक्षेच्या पेपर गैरव्यवहार प्ररकरणी जी. ए. सॉफ्टवेअरचे डॉ. प्रीशीत देशमुख, अश्विनकुमार यांना अटक करण्यात आली आहे. या पेपरफुटीमध्ये आता जी. ए. सॉफ्टवेअरचे संस्थापक गणेशन याचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सायबर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. मात्र, तो अद्याप पर्यंत हजर झालेला नाही.

सौरभ त्रिपाठी, निखिल कदम आणि अश्विनकुमार शिवकुमार या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी न्यायालयात आणले होते. यावेळी या गुन्ह्यात जीए सॉफ्टवेअर कंपनीचे बंगलुरुचे व्यवस्थापक गणेशन यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

हे देखील पहा -

सल्लागार अभिषेक सावरीकर, डॉ. प्रीतीश देशमुख आणि सौरभ त्रिपाठी यांच्यात टीईटी परीक्षेमध्ये अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्याबाबत डिसेंबर २०१७ मध्ये दिल्लीत बैठक झाली होती. राज्य परीक्ष परीषदेने टीईटी २०१८ परीक्षेतील ८१ बनावट प्रमाणपत्रे दिली आहेत. ती कोणी तयार केली, याचा तपास सुरु आहे.

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी जी.ए सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशनचाही सहभाग
नवी मुंबईला सावत्रपणाची वागणूक का देता? गणेश नाईक यांचा सवाल

दरम्यान, सुखदेव ढेरे यांच्या घरझडतीमध्ये २ लाख ९० हजार ३८० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. निखिल कदम यांच्याकडील मोबाईलमधून अश्विनकुमार याला पाठविलेले ई मेल प्राप्त झाले आहेत. निखिलने अश्विनकुमार याला ५६ परीक्षार्थींची यादी दिली होती. तुकाराम सुपे यांच्या कार्यालयातील संगणकावरच टीईटी २०२० मधील ८०० अपात्र परीक्षार्थींकडून एजंटांमार्फत पैसे घेत मार्क वाढवले होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com