शेतकऱ्यांना पुण्यात न्याय मिळेना; थेट मंत्रालयात धडक! सर्व कागदपत्रे तपासून पोलीस संरक्षणात कंपाऊंड पूर्ववत करण्याचे निर्देश

फुरसुंगी येथे शेतजमिनीचे कंपाऊंड पोलिसांसमोर तोडल्याचा आरोप करत शेतकर्यांनी मंत्रालयात धाव घेतली. फुरसुंगी पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने शेतकर्यांनी न्याय मिळवून देण्याची आर्त हाक दिली आहे.
FURSUNGI FARMLAND COMPOUND DEMOLITION
FURSUNGI FARMLAND COMPOUND DEMOLITIONsaam tv
Published On: 

या प्रकरणात फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या कार्यपद्धतीवर शेतकऱ्यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. त्यांच्या भूमिकेची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी येथे शेतजमिनीच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेले कंपाऊंड पोलिसांसमोर तोडण्यात आल्याचा आरोप करत न्यायाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी थेट मंत्रालय गाठले. फुरसुंगी पोलीस ठाण्यात न्याय मिळत नसल्याचा आरोप करत शेतकरी दत्तात्रय हरपळे, अतुल हरपळे आणि शोभा हरपळे यांनी आज महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडत संबंधित प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.

मौजे फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे येथील गट क्रमांक १४५/११ मधील शेतजमिनीवर उभारण्यात आलेले पत्र्याचे कंपाऊंड तोडण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ही घटना पोलिसांसमोर घडल्याचे सांगत संबंधित प्रकरणात अपेक्षित कायदेशीर कारवाई झाली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. उलट, स्वतःच्या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

FURSUNGI FARMLAND COMPOUND DEMOLITION
पुणे शिक्षक मतदारसंघाचा विजयाचा कोटा ठरला; सानप, गावडे की आसगावकर, सध्या कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर?

शेतकऱ्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासमोर आपली बाजू मांडल्यानंतर, मंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याचे निर्देश दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. संबंधित शेतकऱ्यांना त्वरित पोलीस संरक्षण उपलब्ध करून देऊन त्यांचे तोडण्यात आलेले कंपाऊंड पूर्ववत उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश दिल्याची माहिती आहे.

मंत्रालयातील भेटीनंतर आता शेतकऱ्यांना पोलीस संरक्षण मिळून कंपाऊंड पुन्हा उभारले जाणार का आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

FURSUNGI FARMLAND COMPOUND DEMOLITION
पुणे पदवीधरमध्ये पहिल्या पसंतीत हर्षदा देशमुख आघाडीवर, शिक्षक मतदारसंघात काय स्थिती? पाहा लेटेस्ट अपडेट

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या जमिनीच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, तक्रारीची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांची कायदेशीर तपासणी करण्यात यावी, या प्रमुख मागण्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com