Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sushil Kedia On Raj Thackeray: सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या ऑफिसची तोडफोड केली होती. मनसेने धडा शिकवल्यानंतर सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांची माफी मागितली.
Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO
Sushil KediaSaam Tv
Published On

मराठी भाषा बोलण्यावरून झालेल्या वादात उद्योजक सुशील केडिया यांनी उडी घेतली होती. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकी दिली होती. या धमकीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी सुशील केडिया यांच्या ऑफिसची तोडफोड केली. मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवल्यानंतर सुशील केडिया यांना जाग आली आणि त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत थेट राज ठाकरे यांची माफी मागितली. काल मराठी बोलणार नाही असं बोलणारे सुशील केडिया आज सुतासारखे सरळ झाले. मी मराठी भाषा फडाफडा बोलेल असं त्यांनी या व्हिडीओद्वारे सांगितले.

सुशील केडिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी त्यामध्ये असे सांगितले की, 'माझ्या ट्विटचा वेगळा अर्थ काढला गेला. माझी चूक मला मान्य आहे. मी राज ठाकरे यांची माफी मागितली आहे. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मी माझे वक्तव्य मागे घेतो.'

त्यांनी पुढे सांगितले की, 'लवकरच मी मराठी भाषा अतिशय चांगल्या पद्धतीने शिकेल. हे खराब झालेले वातावरण नीट करा. माझी चूक मला समजली असून ती मी सुधारू इच्छित आहे. ते ट्वीट मी तणाव आणि दडपणाखाली केले. जसं महाराष्ट्रात राहून मराठी माणसं अस्खलित मराठी बोलतात. त्या पद्धतीने ३० वर्षे राहूनही मला मराठी बोलता आले नाही. माझ्याकडून चूक झाली मी राज ठाकरेंची माफी मागतो.'

शुक्रवारी सुशील केडिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर राज ठाकरे यांना टॅग करत आव्हान करणारी पोस्ट केली होती. त्यांनी लिहिले होते की, 'मुंबईमध्ये ३० वर्षांपासून राहिल्यानंतर सुद्धा मला मराठी व्यवस्थित समजत नाही आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी प्रतिज्ञा केली आहे की जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. तुम्हाला काय करायचे ते बोल?.'

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO
Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

या ट्विटनंतर सुशील केडिया यांनी आणखी एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की, 'ड्रामा बंद कर तुमचे दोन-तीन गुंडे १०-१२ फटके मारतील तर मारतील. आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर आणि जोपर्यंत तू हात जोडून माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण केलं तर, तुझं काय राहणार?' त्यांची ही वादग्रस्त पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO
Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com