Kalyan Crime News: धक्कादायक! कल्याणमध्ये 5 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार, नामांकित शाळेतल्या डान्स शिक्षकाचे कृत्य...

Kalyan News: धक्कादायक! कल्याणमध्ये 5 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार, नामांकित शाळेतल्या डान्स शिक्षकाचे कृत्य...
Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam tv
Published On: 

>> अभिजित देशमुख

Kalyan Crime News: कल्याण पूर्व परिसरातील एका नामांकित शाळेत पाच वर्षाच्या अल्पवयीन मुलावर शाळेत डान्स शिकवण्यासाठी आलेल्या डान्स टीचरने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

या प्रकरणी डान्स टिचरला कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून कल्याणपूर्वक गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून देखील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतरही गुन्हेगारी वाढत असल्याने ही गुन्हेगारी थांबवण्याचा आव्हान कल्याण कोळशेवाडी पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

Kalyan Crime News
Investment Tips: 100 रुपयांची बचत करून जमा करू शकता तब्बल 68.4 लाख, जाणून घ्या काय आहे योजना...

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या एका पाच वर्षीय मुलाने आपल्यासोबत घडलेला प्रसंग आई आणि वडिलांना सांगितल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला आहे. मुलाने त्यांना सांगितलं की, त्याच्यासोबत काही तरी अनैतिक प्रकार घडला आहे. या बाबत आई वडिलांनी शाळेत जाऊन विचारपूस करण्याचे ठरविले. (Latest Marathi News)

मात्र ही घटना शुक्रवारी घडली होती. शनिवार रविवारी शाळा बंद होती. सोमवारी आई वडिल शाळेत पोहचले आणि शाळेला माहिती दिल्यानंतर घटना समोर आली की, मुलासोबत शाळेच्या शौचालयात लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

Kalyan Crime News
Mill Workers News: गिरणी कामगारांना मिळणार हक्काचं घरं, सरकार काढणार 5 हजार घरांची लॉटरी

हे कृत्य दुसरे कोणी नाही तर शाळेत डान्स शिकवणाऱ्या टिचरने केला होता. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी डान्स टिचरला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.