Kalyan News: फी न भरल्याने पाच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून रोखलं, कॉलेज प्रशासनाकडून मात्र आरोपांचं खंडन

शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी महाविद्यालयात धाव घेत शिक्षकांना खडेबोल सुनावले.
Kalyan
Kalyan Saam TV

>> अभिजीत देशमुख

कल्याण : फक्त साडे चार हजार रुपये फी बाकी असल्याने एका विद्यार्थीनीचा परीक्षेचा पेपर हिसकावून घेतल्याची घटना कल्याण पूर्व भागातील साकेत महाविद्यालयात घडली आहे. अन्य चार विद्यार्थांसोबत देखील फी न भरल्याने महाविद्यालय प्रशासनाने परीक्षा देण्यास मज्जाव केल्याचा आरोप करण्यात येतो आहे.

या प्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी महाविद्यालयात धाव घेत शिक्षकांना खडेबोल सुनावले. आपली चूक लक्षात येताच महाविद्यालय प्रशासनाने माफी मागितल्याचे बोलले जात आहे. दरम्यान याबाबत महाविद्यालय प्रशासनाने मात्र या आरोपांचे खंडन केले आहे. (Latest News)

Kalyan
Viral Video : 'जो पत्ता करतो गुल...', रविंद्र धंगेकरांच्या विजयी मिरवणुकीत परदेशी तरुणीचा बेभान डान्स

कल्याण पूर्व भागातील शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना माहिती मिळाली होती की, साकेत महाविद्यालयात बिझनेस कम्यूनिकेशन लॉ या विषयात शिक्षण घेत असलेल्या सानिका नावाच्या एका विद्यार्थीनीचा परीक्षेचा पेपर शिक्षकांनी पेपर हिसकावून घेतला. अन्य चार विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रशासनाने मज्जाव केल्याचा आरोप करण्यात येत होता . यानंतर महेश गायकवाड त्याठिकाणी पोहचले.

त्यांनी शिक्षकाला या घटनेचा जाब विचारला. फीसाठी विद्यार्थ्याचे भविष्य बरबाद करणार का हे शोभते का? याच कारणास्तव विद्यार्थी आत्महत्या करतात . हे तुम्हाला शोभते का असे खडेबोल त्यांनी सुनावले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत महेश गायकवाड असा कोणताही त्रास होत असल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे.

Kalyan
kalyan News : लोकल ट्रेनमध्ये बसण्याच्या वादातून वृद्धाची हत्या? संशयित पोलिसांच्या ताब्यात

याबाबत साकेत कॉलेजचे मुख्याध्यापक डॉक्टर भराटे यांच्याशी संपर्क साधला असता, फी भरली नाही म्हणून परीक्षेला बसू दिले नाही या आरोपाचे त्यांनी खंडन केले. इंटरनल परीक्षा दोन वेळा होते. कोणतेही विद्यार्थ्याला परीक्षेपासून वंचित ठेवणार नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com