kalyan News : लोकल ट्रेनमध्ये बसण्याच्या वादातून वृद्धाची हत्या? संशयित पोलिसांच्या ताब्यात

बबन हांडे देशमुख हे सेवा निवृत्त होते.
Kalyan
Kalyan Saam TV

>> अभिजीत देशमुख

कल्याण : लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी आणि त्यामुळे प्रवाशांमधील भांडणाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरुन अनेकदा भांडण झालेलं तुम्ही पाहिलं असेल.

अशाच एका घटनेत कल्याण-टिटवाळा दरम्यान वयोवृद्ध व्यक्तीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये चढताना किंवा बसण्यामुळे वाद झाला असावा या वादातून झालेल्या मारहाणीत हत्या झाली असावी अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (Latest News)

Kalyan
Manmad News : कांदा लागवडीसाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवले तेही अडकले, अन् नातीचं लग्नही लांबणार; मनमाडच्या शेतकऱ्याचं दु:ख

मिळालेल्या माहितीनुसार, धावत्या लोकलमध्ये लगेज डब्यात वयोवृद्ध व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. कल्याण-टिटवाळा दरम्यान ही घटना घडली आहे. बबन हांडे देशमुख असं मयत व्यक्तीचं नाव आहे. बबन हांडे देशमुख हे सेवा निवृत्त होते. धारदार शस्त्राने त्यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Kalyan
Kasba byelection 2023 : कसब्यात रविंद्र धंगेकरांचा विजय 'मनसे'मुळे सोपा झाला? अजित पवारांची प्रतिक्रिया बरंच काही सांगून गेली

बबन हांडे हे अंबिवली येथे राहत होते. कल्याणमध्ये कामानिमित्त आले होते. कल्याणहून ट्रेनने अंबिवलीच्या दिशेने जात असताना ही घटना घडलीय. कल्याण जीआरपी पोलिसांनी एका संशयिताला याप्रकरणी ताब्यात घेतलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com