ठाणे: एकीकडे ठाणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे आता ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. तो आकडा आता १९ झाला आहे. त्यातच बुधवारी मृत्यू झालेल्या वृद्धाला कोरोना आणि ‘एच ३ एन २’ अशा दोन्ही प्रकारच्या आजारांची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर ‘एच ३ एन २’ चा ठाण्यातील तो पहिला बळी म्हणून नोंदवला गेला आहे.
ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असताना मात्र ठाणे महापालिका हद्दीतही रुग्णांसह उपचारादरम्यान मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडा आठवड्यात तीन झाला आहे. ते तिघे ७० वर्षांवरील असून त्यांना सहव्याधी होते. त्यातच बुधवारी मृत्यू झालेल्या वृद्धाला खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचीही लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालातून उघड झाले होते.
H3N2 व्हायरस म्हणजे काय?
आजकाल सर्वात जास्त H3N2 विषाणू (Virus) अडचणीचे कारण बनले आहे. हा विषाणूजन्य वंशातील इन्फ्लुएंझा विषाणू A चा उपप्रकार आहे, जो मानवी इन्फ्लूएंझाचे प्रमुख कारण आहे.
H3N2 चा सर्वाधिक धोका कोणाला आहे?
दमा असलेले रुग्ण
मधुमेह असलेले रुग्ण
हृदयरोग असलेले रुग्ण
कमकुवत रोगप्रतिकार प्रणाली असलेले लोक
न्यूरोलॉजिकल किंवा न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर
पाच वर्षाखालील मुले
H3N2 लक्षणे
ताप
खोकला
घसा खवखवणे
वाहणारे किंवा भरलेले नाक
शरीर वेदना
डोकेदुखी
थकवा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.