पिंपरी-चिंचवड शहरातील एका गोदामाला सोमवारी (२२ जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. बघता-बघता आगीचा भडका उडाला. स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मात्र, या आगीत दोन तरुणांचा होरपळून मृत्यू झाला. वाल्हेकर वाडी परिसरातील ही दुर्देवी घटना घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत असून पुन्हा एकदा अनधिकृत पोट माळ्याच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Latest Marathi News)
पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील वाल्हेकर वाडी परिसरात अनाधिकृत पोट माळे आहेत. काही दिवसांपूर्वी महापालिकेने या पोटमाळ्यांचे सर्वे केले होते. मात्र, हे सर्वे फोल ठरल्याचं दिसून आलं. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका पोटमाळ्यातील गोदामाला अचानक आग लागली. यावेळी दोन तरुण पोटमाळ्यावर अडकून पडले.
स्थानिकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आगीच्या धुरात घुसमटून दोन्ही तरुण बेशुद्ध झाले. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र, आगीत दोन तरुणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांची नावे अद्याप समोर आली नाही.
पुण्यात सोमवारी (२२ जानेवारी) आगीच्या 3 मोठ्या घटना घडल्या. एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाच्या जवानांची चांगलीच दमछाक झाली. सुदैवाने तिन्ही घटनांमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, लाखो रुपयांचे नुकसान झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.