Girgaon Fire: गिरगावमधील गोमंती भवन इमारतीला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Girgaon Fire : गिरगांव चौपाटी येथील गोमती भवन या रहिवाशी इमारतीला आग लागल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले असून आग शमवण्याचे प्रयत्न करत आहे.
Girgaon Fire
Girgaon Fire
Published On

Girgaon Gomanti Bhavan Building Fire:

गिरगाव चौपाटी येथील गोमती भवन इमारतीला लागली आग लागल्याची घटना घडलीय. इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याला आग लागलीय. आग शमविण्यासाठी ८ फायर इंजिन, आणि अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले आहे. अद्याप कोणतीच जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळालीय. (Latest News)

कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनाने घेतला पेट

डी एन नगर मेट्रो स्थानकाखाली धावत्या वाहनाने अचानक पेट घेतला. मुंबईचा अंधेरी पश्चिमेकडील नगर मेट्रोस्थानकाखाली चालत्या वाहनाने पेट घटल्याची घटना घडली. कचरा वाहतूक करणारी मिनी वाहन जयप्रकाश रोड मार्गे चार बंगला वर्सोवाच्या दिशेने जात होते. गहे वाहन मेट्रोस्थानकाखाली आली असताना वाहनाने अचानक पेट घेतला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या आगीत वाहन पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. वाहनाने पेट घेताच चालक आणि क्लिनरने वाहनातून उतरल्यामुळे सुखरूप बाहेर पडले. मात्र मुख्य रस्त्यावरच गाडीने पेट घेतल्यामुळे अंधेरीकडून वर्सोवाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.

Girgaon Fire
Mumbai Crime News: हायप्रोफाइल सोसायटीत सुरू होता 'हायप्रोफाइल' जुगार अड्डा; धाड टाकली अन् पाहून पोलीसही चक्रावले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com