Mumbai Fire News : मुंबईतील मेट्रो स्थानकाजवळील इमारतीच्या १६ व्या मजल्यावर आग

Mumbai Kandivali Residential Building Fire News : मुंबईतील कांदिवली येथील टोलेजंग इमारतीच्या १६ व्या मजल्यावर भीषण आग लागली.
Mumbai Kandivali Residential Building Fire News
Mumbai Kandivali Residential Building Fire News SAAM TV
Published On

संजय गडदे, मुंबई

Mumbai Kandivali Residential Building Fire News : मुंबईतील कांदिवली येथील डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकाजवळील एका टोलेजंग इमारतीच्या १६ व्या मजल्यावर भीषण आग लागली. सकाळी १० वाजता ही आग लागली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी पोहोचले. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले.

मुंबईतील कांदिवली पश्चिमेकडे डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकाजवळील इमारतीला आज, शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास मोठी आग लागली. या दुर्घटनेत सुदैवानं कुणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  (Latest Marathi News)

Mumbai Kandivali Residential Building Fire News
Mumbai BEST Worker Protest: मुंबईकरांचे हाल! सलग तिसऱ्या दिवशीही बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या (Mumbai News) कांदिवली पश्चिमेकडे डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकाजवळ जेपी ऑर्चिड इमारत आहे. या इमारतीच्या १६ व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये सकाळी १० वाजताच्या सुमारास आग लागली.

आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान ६ बंबांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. सुदैवाने या आगीत कोणतेही जीवितहानी झाली नाही.

Mumbai Kandivali Residential Building Fire News
Pune Airport Blast Threat: ७५ वर्षांच्या आजीने दिली पुणे विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रवाशांचा एकच गोंधळ अन् अधिकाऱ्यांची धावपळ

नागरिकांना सुखरूप बाहेर काढले

इमारतीच्या १६ व्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागल्यानंतर त्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. तात्काळ घटनास्थळी अग्निशमन बंब पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले, अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली. इमारतीतील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. इमारतीमध्ये कुणीही अडकले नसल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com