अपघातप्रकरणी NHAI व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
अपघातप्रकरणी NHAI व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करासागर आव्हाड

अपघातप्रकरणी NHAI व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

मनसे च्या रस्ते-आस्थापना विभागाचे जिल्हाध्यक्ष जगदीश वाल्हेकर यांची मागणी
Published on

पुणे : मुंबई-बंगळूर महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळ गेल्या तीन दिवसांपासून भीषण अपघात होऊन काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वारंवार अपघात होऊन आणि पाठपुरावा करूनही वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक सुविधा पुरवल्या जात नाहीत. या ठिकाणी होणाऱ्या अपघातांना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआयए) व रिलायन्स इन्फ्रा यांचा हलगर्जीपणा जबाबदार आहे.

हे देखील पहा :

त्यांच्यावर या अपघाताप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) रस्ते-आस्थापना विभागाचे जिल्हाध्यक्ष जगदीश वाल्हेकर यांनी केली आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन वाल्हेकर यांनी रविवारी सिंहगड रोड पोलीस स्टेशनला दिले.

अपघातप्रकरणी NHAI व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
Crime: वहिनीच्या कामगाराला तलवार घेऊन धमकवायला गेला अन् जीव गमावून बसला!
अपघातप्रकरणी NHAI व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
Nagpur : बापरे! चारित्र्याच्या संशयावरून झोपलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर टाकले उकळते तेल!

पोलीस अधिकाऱ्यांनी हे निवेदन स्वीकारत दोषींकर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी उपजिल्हा अध्यक्ष प्रवीण आग्रे, ऍड. सुनील कोरपडे, सूर्यकांत कोडीतकर, राहुल वाळुंजकर, आकाश साळुंके, ओंकार पिसाळ, मुथप्पा तारापुरे आदी मनसे सैनिक उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com