धक्कादायक! पबजी खेळण्यात गुंतला अन् थेट इमारतीवरून खाली पडला

गेम खेळण्याच्या नादात सध्या तरुण इतके गुंग होऊन जातात की त्यांना कशाचच भान राहत नाही
PUBG
PUBGSaam Tv

पालघर - पबजीचे (PUBG) अनेक किस्से वारंवार समोर आलेले आहेत. नुकतेच पबजी हा खेळ खेळणं पालघर (Palghar) मधील शिरगाव येथिल एका 16 वर्षीय युवकाला चांगलच महागात पडला आहे. हा तरुण आपल्या मित्रांसोबत शिरगाव येथील एका अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीवर पबजी खेळत होता.

मात्र तो या पबजी खेळात इतका गुंतला की तो दुसऱ्या माळ्यावर आहे याचा त्याला विसर पडला. खेळता खेळता अचानक हा युवक दुसऱ्या माळ्यावरून खाली पडला असून यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी शादान वर सध्या पालघर मधील रिलीफ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे देखील पाहा -

या गेममुळे मुलांमध्ये हिंसा, आक्रमकता, ऑनलाईनचे वेड आणि व्यसनाधीनता वाढत चालली आहे. काहींनी तर पब्जी वेडापायी आपला जीव देखील गमावला असल्याची धक्कदायक घटना घडली आहे. तर काहीचं मानसिक स्वास्थ्य बिघडल. त्यामुळे याची गंभीर घेत केंद्राने या गेमवर बंदी आणली आहे. मात्र बंदी असतानाही लहान मुलं पबजी गेम खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

PUBG
Buddha Purnima 2022: भारत-नेपाळचे पंतप्रधान भेटणार; पीएम मोदी नेपाळच्या दौऱ्यावर

दरम्यान याआधी नाशिकचा एक मुलगा पबजी खेळता खेळता नांदेडला पोहचला. नांदेडमध्ये राहाणारा १२ वर्षांचा हा अल्पवयीन मुलगा पबजी खेळण्यासाठी मोबाईल घेऊन घरातून निघून गेला. आई-वडिलांनी मुलगा घरातून निघून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरु करत मुलाचा मोबाईल ट्रॅक केला.

यावेळी हा मुलगा मुंबई-तपोवन एक्स्प्रेसने मुंबईकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याची माहिती सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. तपोवन एक्स्प्रेस नाशिकमध्ये पोहचल्यावर नाशिक पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतलं. यानंतर त्या मुलाला कुटुंबांच्या स्वाधिन करण्यात आलं.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com