Purandar Airport: विमानतळाच्या ड्रोन सर्वेला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध, पोलिसांकडून लाठीचार्ज, रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण

Purandar Farmers Clash with Police: पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुरु असलेल्या ड्रोन सर्वेला सातही गावांतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. यावेळी विरोध दर्शवताना पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला.
Purandar
PurandarSaam
Published On

पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आतंरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होत आहे. सध्या शासनाकडून आतंरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू आहे. मात्र, बाधित सातही गावातील शेतकऱ्यांनी या ड्रोन सर्वेक्षणाला विरोध दर्शवला. अधिकाऱ्यांना सर्वेक्षणादरम्यान, वाट अडवल्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाले. या अमानुष कारवाईचा शेतकऱ्यांनी आणि स्थानिकांनी जाहीर निषेध केला आहे.

पुरंदर विमानतळासाठी चालू असलेल्या ड्रोन सर्वेला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध सुरू आहे. यावेळी काही आंदोलक शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांची वाट अडवली. जनावरे आणि बैलगाड्या रस्त्यावर उभे करून शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ड्रोन सर्वेवरून शेतकरी आणि शासन यांच्यात संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं.

Purandar
India-Pakistan: पाकिस्तानच्या मदतीला चीन धावून आला, पुरवली घातक क्षेपणास्त्र; भारतची चिंता वाढणार?

स्थानिक शेतकरी ड्रोन सर्वेला विरोध करत असतानाच, आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे अनेक शेतकरी यात रक्तबंबाळ झाले. या अमानुष कारवाईचा शेतकऱ्यांनी आणि स्थानिकांनी जाहीर निषेध केला.

Purandar
NEET परीक्षेआधीच विद्यार्थ्यानं आयुष्याचा दोर कापला, घरात गळफास घेऊन संपवलं आयुष्य, बीडमध्ये हळहळ

विमानतळामुळे बाधित होणाऱ्या गावांमध्ये सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी अधिक आक्रमक होत असून, शेतकऱ्यांनी प्रशासनावर अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com