Bhalchandra Nemade Mumbai News : आपण अजूनही इंग्रजीचे गुलाम; भालचंद्र नेमाडे असं का म्हणाले?

Bhalchandra Nemade Mumbai News in Marathi |ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी आणखी एक विधान केलं आहे. आपण इंग्रजी भाषेचं गुलाम असल्यासारखे मुलांना शाळेत पाठवते असं नेमाडे म्हणाले आहेत.
Bhalchandra Nemade Mumbai News
Bhalchandra Nemade Mumbai News Saam tv
Published On

>>तुषार ओव्हळ

Bhalchandra Nemade Latest News:

'इंग्रज बरे होते, त्यांनी महाराष्ट्राला पेशव्यांच्या तावडीतून सोडवलं, असं विधान ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केलं होतं. आता नेमाडे यांनी आणखी एक विधान केलं आहे. आपण इंग्रजी भाषेचं गुलाम असल्यासारखे मुलांना शाळेत पाठवते असं नेमाडे म्हणाले आहेत. मराठी अभ्यास केंद्र आणि अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमात नेमाडे आपली रोखठोक मतं व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

नेमाडे काय म्हणाले?

'आपल्या देशात जेव्हा मातृभाषेत शिक्षण देत होतो, तेव्हा आपला देश संधोधात आघाडीवर होता. आता आपण मातृभाषेतून शिक्षण देण्याचं प्रमाण कमी केलं आहे. खाटीकखान्यात जसे गुरांना पाठवतात तसे पालक आपल्या मुलांना बस आणि रिक्षांमध्ये कोंबून शाळेत पाठवतात. भारतीयांना गुलाम करताना इंग्रजांनी आधी आपल्याला आपल्या मातृभाषेपासून तोडलं. आता मुलांना इंग्रजी शाळेत पाठवून मुलांचा कोंडमारा करतोय. मुलांना इंग्रजी भाषेत शिकवलेलं कळत नाही, मुलांना मराठी माध्यमांच्या शाळेत पाठवा आणि नैसर्गिपणे शिकू द्या, असं नेमाडे म्हणाले आहे.

Bhalchandra Nemade Mumbai News
Radhakrishna Vikhe Patil News: गोपीचंद पडळकर चप्पलफेक प्रकरणावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले, 'प्रत्येकाला...'

नेमाडेंनी सांगितली चीनची आठवण

'मी काही अन्य भाषिक सहकाऱ्यांसह चीनला गेलो होतो, चीनमध्ये आम्ही सगळे इंग्रजीतच एकमेकांशी संवाद साधत होतो. त्यावेळी चीनी नागरिकांनी आम्हां सगळ्यांच्या मातृभाषा वेगळ्या असून इंग्रजीत कसे बोलता, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले, तेव्हा आम्ही आमच्या देशात मातृभाषेऐवजी इंग्रजीतून शिक्षणाचे प्रमाण वाढत चालल्याचे त्यांना सांगितले. इंग्रजी गरजेपुरते यायला हवे,आपला सगळा समाजच आज गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी नेमाडे यांनी चीनची आठवण सांगितली.

नेमाडे म्हणाले, की चीनमध्ये गेल्यावर आम्ही सहकारी इंग्रजीतच बोलत होतो. तेव्हा चीनच्या काही लोकांनी आम्हाला विचारलं की तुम्ही सगळे लोक एकमेकांशी इंग्रजीत का बोलताय? तेव्हा भारतात मातृभाषेऐवजी इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्याचं प्रमाण वाढलंय. इंग्रजी गरजेपुरतं यायला हवं आपला संपूर्ण समाज गोंधळलेल्या अवस्थेत असंही नेमाडे म्हणालेत.

Bhalchandra Nemade Mumbai News
Nitesh Rane News: 'देवेंद्र फडणवीसांवर टीका कराल तर...' नितेश राणेंचा मनोज जरांगे पाटलांना इशारा

'मोबाईलमध्ये जी टेक्नॉलॉजी वापरतो ती दक्षिण कोरियाची आहे. हा देश महाराष्ट्रापेक्षा लहान आहे. य देशाने मातृभाषेतून शिक्षण दिलं. अनेक विकसित देशात मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं. आपण गुलामी पत्करली म्हणून आपण इंग्रजीला अतिमहत्त्व देतोय. फ्रान्स सारख्या देशात इंग्रजी भाषेचा तिरस्कार करतात. युरोमधील अनेक देशांना इंग्रजीचं वाढलेलं महत्व मान्य नाही आहे. आपण या इंग्रजी भाषेला इतक्या वर्षानंतरही डोक्यावर का चढवून घेतलंय? असा सवालही नेमाडे यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com