Radhakrishna Vikhe Patil News: गोपीचंद पडळकर चप्पलफेक प्रकरणावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले, 'प्रत्येकाला...'

Radhakrishna Vikhe Patil On Gopichand Padalkar: चप्पलफेकीच्या घटनेनंतर काही ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. तर या प्रकणावर प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Political News
Maharashtra Political NewsSaam tv
Published On

Radhakrishna Vikhe Patil on Gopichand Padalkar:

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर काल पुण्यात मराठा आंदोलकांनी चप्पलफेक केली. या प्रकरणानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. या घटनेनंतर काही ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. तर या प्रकणावर प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान बारामती येथील विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोपीचंद पडळकर चप्पलफेक प्रकरणावर भाष्य केलं.

'प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो. असे जे प्रकार घडत चालले आहेत. असेच जर प्रकार घडत गेले, तर सद्यस्थितीत गंभीर प्रश्न निर्माण होतात'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Political News
Nitesh Rane News: 'देवेंद्र फडणवीसांवर टीका कराल तर...' नितेश राणेंचा मनोज जरांगे पाटलांना इशारा

'काही लोकांच्या भावना होत्या, त्यामुळे ती स्वाभाविक प्रतिक्रिया होती. मात्र आता हा प्रश्न संपलेला आहे. भविष्यकाळात अशा घटना होऊ नयेत यामुळे दक्षता घेतली पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.

नाना पटोले यांचे मोघम आरोप, विखे पाटील यांची टीका

नाना पटोले यांच्या आरोपावर भाष्य करताना विखे पाटील यांनी भाष्य केलं. 'विरोधी पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आरोप करणाऱ्यांची मालिका पाहिली, तर फक्त ते मोघम स्वरूपाचे आरोप करत आहेत. केवळ संशय निर्माण करत आहेत. एखाद्या मंत्र्यांचे नाव घेण्यापेक्षा त्यांनी त्या मंत्र्याचं नाव जाहीर करावं. याबाबत त्यांना कोणी अडवला आहे का? असा सवालही विखे पाटील यांनी केला.

रोहित पवारांनी केलेल्या आरोपावरही विखे पाटील यांनी भाष्य केलं. 'रोहित पवार केव्हापासून राज्याचे नेते झाले आहेत. आम्ही त्यांच्या प्रतिक्रियेवर भाष्य करण्याची आवश्यकता आहे? असा प्रश्न करत विखे पाटील यांनी टोला लगावला.

Maharashtra Political News
Maharashtra Politics: मिशन 45+ अंतर्गत महायुती लागली कामाला, नाशिकमध्ये तिन्ही पक्षांची एकत्र बैठक

आरक्षणावरील नेत्यांच्या भाषणावर विखे पाटील काय म्हणाले?

आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सुरु झालेल्या राजकारणावरही विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. 'लोक काही वक्तव्य करत आहेत. त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. वैमनस्य तयार होणं ही गोष्ट आपल्या राज्याला परवडणारी नाही.प्रत्येकाने आपल्या भूमिकेशी एकनिष्ठ राहिल्यावर जाहीर वक्तव्य करणं थांबवलं पाहिजेत, असे विखे पाटील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com