Pune : पुण्यात खळबळ! बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त, दररोज ४०० जणांची होत होती फसवणूक

Pune fake call centre online gaming scam : पुण्यात ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली सुरू असलेले बनावट कॉल सेंटर पोलिसांनी उद्ध्वस्त केले. दररोज ३०० ते ४०० जणांची लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.
Pune cyber crime news
Pune cyber crime news
Published On

Pune cyber crime news : पुण्यात ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली सुरू असलेले बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त करण्यात आले आहे. पुण्यातील हडपसर, फुरसुंगी, भेकराईनगर परिसरात पोलिसांनी छापे मारले. कॉल सेंटर चालवून लोकांना ऑनलाईन गेम खेळण्यास भाग पाडून त्यांच्याकडून पैसे उकळत होते. दररोज ३०० ते ४०० जणांची लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याचे समोर आले. या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या सर्व जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. संतोष दत्ता वेंजणेकर आणि विनायक ऊर्फ दीपक मनोहर इक्के अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर भागात एका इमारती मध्ये बेकायदेशीरपणे कॉल सेंटर सुरू असून त्याठिकाणी नागरिकांना ऑनलाईन गेम खेळून पैसे कमावता येतील असे भासवले जात असे. सुरवातीला अनेकांना गेम खेळून पैस सुद्धा दिले जायचे. एखादा गेम संबंधित व्यक्ती हरला की कॉल सेंटर मधून पुन्हा पैसे जिंकण्याची संधी असल्याचं भासवले जायचे. एकदा संबंधित व्यक्ती त्यांच्या जाळ्यात अडकला की त्याला पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडून त्यांचीच फसवणूक केली जात असायची. या संपूर्ण रॅकेटची माहिती मुंढवा पोलिसांना मिळाली होती.

Pune cyber crime news
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो बँक खाते तपासा! 'या' तारखेला जमा होणार मे महिन्याचे पैसे; ३४५ कोटी मंजूर

सायबर विभागातील पोलिस अधिकारी यासह हडपसर आणि मुंढवा पोलिसांनी या कॉल सेंटर वर छापा टाकला. या कॉल सेंटरमध्ये यातील आरोपी वेंजणेकर ने त्याच्याकडे काम करत असलेल्या नोकरदारांचे आधार कार्ड घेऊन त्यांच्याच नावे सिम कार्ड घेऊन बनावट बँक अकाउंट तयार केली होती.

Pune cyber crime news
Petrol Diesel Rules : मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल खरेदीवर मर्यादा; जाणून घ्या दिवसाला किती लीटर इंधन मिळणार?

या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा दुबईमध्ये असून त्याचा एक सहकारी इतर आर्थिक व्यवहार पाहत होता. या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. छापेमारी केलेल्या कॉल सेंटर मधून पोलिसांनी हार्ड डिस्क, अ‍ॅटो डायलर मशीन, सीम कार्ड, हार्ड डिस्क, कंपनीच्या नावांचे बनावट शिक्के, पास आणि चेक बुक, लॅपटॉप यासह अनेक तांत्रिक गोष्टी मिळून आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune cyber crime news
Suresh Borse Death : राष्ट्रवादीच्या महिला नेत्याच्या पतीचा संशयास्पद मृत्यू, संभाजीनगरमध्ये खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com