Shinde-Fadnavis Government : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार दोन टप्प्यात

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Devendra Fadnvis, Eknath Shinde, Devendra Fadnvis News Today, Eknath Shinde Latest News, Latest Political News
Devendra Fadnvis, Eknath Shinde, Devendra Fadnvis News Today, Eknath Shinde Latest News, Latest Political News Saam Tv
Published On

सुशांत सावंत

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यानंतर आता नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. मात्र खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार आहे. (Eknath Shinde Latest News)

Devendra Fadnvis, Eknath Shinde, Devendra Fadnvis News Today, Eknath Shinde Latest News, Latest Political News
शिवसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील ६६ नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी (Election) काही मंत्र्याचा शपथविधी तर निवडणुकीनंतर काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे जरी दोन टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार होत असला तरी सर्वच खाती लगेच भरली जाणार नाहीत. दोन ते तीन मंत्रिपद रिक्त ठेवली जातील अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटाला १५ मंत्रीपदे तर भाजप स्वतःकडे २८ मंत्रीपदे ठेवण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnvis, Eknath Shinde, Devendra Fadnvis News Today, Eknath Shinde Latest News, Latest Political News
मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारचं खातेवाटप ठरलं; गृह, महसूल खातं कुणाकडे? वाचा सविस्तर...

असे होईल खाते वाटप

गृह, अर्थ, महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा, उच्च आणि तंत्रशिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, पर्यटन, अन्न व नागरी पुरवठा, कौशल्य विकास, ओबीसी विकास ही पदे भाजपकडे असतील.तर शिंदे गटाकडे नगरविकास, खाणकाम, वाहतूक, पर्यावरण, रोजगार हमी, फलोत्पादन, शालेय शिक्षण, मृद व जलसंधारण, उद्योग आदी क्षेत्रे मिळण्याची शक्यता आहे.

ठाकरे सरकारमधील तब्बल 8 मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते. त्यामुळे या सगळ्यांना आपापली खाती परत मिळणार का, हे पाहावे लागेल. दरम्यान, अर्थ, महसूल आणि गृह ही तिन्ही प्रमुख खाती भाजपकडे गेली आहे. (Latest Political News Update)

एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना सोडून मोठा राजकीय धोका पत्कारला आहे. त्यामुळे आपल्याला याचा योग्य तो मोबदला मिळावा, अशी या सर्व आमदारांची अपेक्षा आहे. तेव्हा आता प्रत्यक्षात या आमदारांच्या पदरी कोणती खाती पडणार, हे येत्या काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com