मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारचं खातेवाटप ठरलं; गृह, महसूल खातं कुणाकडे? वाचा सविस्तर...

खाते वाटप कसं होणार याची मोठी माहिती साम टिव्हीच्या हाती लागली आहे.
Eknath Shinde and Devendra fadnavis
Eknath Shinde and Devendra fadnavissaam tv

सुशांत सावंत

मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि भाजपची सत्ता स्थापन झाली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, नव्या सरकारमध्ये कोणाला किती खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. असं असतानाच भाजप आणि शिंदे गटात खाते वाटप कसं होणार याची मोठी माहिती साम टिव्हीच्या हाती लागली आहे. (Eknath Shinde Latest News)

Eknath Shinde and Devendra fadnavis
CM Eknath Shinde : मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह अयोध्येला जाणार?

नव्या सरकारमध्ये लवकरच खाते वाटप होणार असून 28 खाते हे भाजपकडे तर 15 खाती ही शिंदे गटाला मिळणार असल्याची माहिती आहे. गृह महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा, उच्च आणि तंत्रशिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, पर्यटन, अन्न व नागरी पुरवठा, कौशल्य विकास, ओबीसी विकास ही पदे भाजपकडे असतील.

तर शिंदे गटाकडे नगरविकास, खाणकाम, वाहतूक, पर्यावरण, रोजगार हमी, फलोत्पादन, शालेय शिक्षण, मृदा व जलसंधारण, उद्योग मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. या 40 आमदारांपैकी कोणत्या कोणाला मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता लागून आहे. (Eknath Shinde News)

Eknath Shinde and Devendra fadnavis
शिवसेनेच्या महिला आघाडीने वाचला समस्यांचा पाढा; नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

ठाकरे सरकारमधील तब्बल 8 मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते. त्यामुळे या सगळ्यांना आपापली खाती परत मिळणार का, हे पाहावे लागेल. दरम्यान, अर्थ, महसूल आणि गृह ही तिन्ही प्रमुख खाती भाजपकडे गेली आहे.

एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना सोडून मोठा राजकीय धोका पत्कारला आहे. त्यामुळे आपल्याला याचा योग्य तो मोबदला मिळावा, अशी या सर्व आमदारांची अपेक्षा आहे. तेव्हा आता प्रत्यक्षात या आमदारांच्या पदरी कोणती खाती पडणार, हे येत्या काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com