मुंबई: ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा (ShivSena)बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाणे महानगरपालिकेतील ६७ नगरसेवक पैकी ६६ नगरसेवकांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन बंगल्यात जाऊन भेट घेतली. ६६ माजी नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये माजी महापौर नरेश मस्के समवेत या नगरसेवकांंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. (Shiv Sena Latest News)
६७ नगरसेवकांपैकी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे या मात्र शिवसेनेतच राहिल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (EKnath Shinde) गट आता अशी दुफळी ठाण्यात निर्माण झाल्याचे चित्र या भेटीमुळे दिसून येत आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. भाजप-शिंदे गट एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेतील (ShivSena) या बंडमुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे दिसत आहे. राज्यातील पदाधिकारी शिंदे गटात सामील होत असल्याचे दिसत आहे.
ठाण्यातील नगरसेवकांनी काल एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि भाजपची सत्ता स्थापन झाली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, नव्या सरकारमध्ये कोणाला किती खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. असं असतानाच भाजप आणि शिंदे गटात खाते वाटप कसं होणार याची मोठी माहिती साम टिव्हीच्या हाती लागली आहे.
नव्या सरकारमध्ये लवकरच खाते वाटप होणार असून 28 खाते हे भाजपकडे तर 15 खाती ही शिंदे गटाला मिळणार असल्याची माहिती आहे. गृह महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा, उच्च आणि तंत्रशिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, पर्यटन, अन्न व नागरी पुरवठा, कौशल्य विकास, ओबीसी विकास ही पदे भाजपकडे असतील. (Eknath Shinde Latest News)
तर शिंदे गटाकडे नगरविकास, खाणकाम, वाहतूक, पर्यावरण, रोजगार हमी, फलोत्पादन, शालेय शिक्षण, मृदा व जलसंधारण, उद्योग मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. या 40 आमदारांपैकी कोणत्या कोणाला मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता लागून आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.