हे लोकशाहीचे वातावरण नाही, राजकीय हेतूने ईडीची कारवाई- आदित्य ठाकरे

"आपल्याला सरळ सरळ दिसत आहे हे सर्व राजकीय हेतूने होत आहे. कुठे ना कुठे तरी बदलाची भावना घेऊन हे सर्व होत आहे."
Aditya Thackeray
Aditya ThackeraySaam Tv
Published On: 

प्राची कुलकर्णी

पुणे: आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच टाकली आहे. ईडीने राऊत यांची अलिबागमधील मालमत्ता, तसेच मुंबईतील दादर येथील फ्लॅटवर जप्तीची कारवाई केली आहे. तर या कारवाईबाबत राजकीय वर्तुळातून याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तर, या कारवाई सर्व राजकीय हेतूने होत आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, " आपल्याला सरळ सरळ दिसत आहे हे सर्व राजकीय हेतूने होत आहे. कुठे ना कुठे तरी बदलाची भावना घेऊन हे सर्व होत आहे. हे आपल्या देशात जे काही चालले आहे ते लोकशाहीचे वातावरण नाही. हे राजकीय वातावरण नाही हे दवबावाचे राजकारण चालले आहे."

Aditya Thackeray
Sanjay Raut: मी सर्वसामान्य शिवसैनिक, किरीट सोमय्या 'चु**'...; राऊत कडाडले

तर, शिवसेना ही भाजपसोबत गेली नाही याचे परिणाम म्हणजे या कारवाया आहेत का असा प्रश्न विचारल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, अश्या जर धमक्या यायला लागल्या तर आपल्या लोकशाहीचे वातावरण आहे का? हे विचार करण्याची गरज आहे. परवा सभेत कोणीतरी सांगितलं आहे जर तुम्ही एक पक्षाला मतदान नाही केलं तर तुमच्या मागे इन्क्वायरी लावू. जनतेला अश्या धमक्या देण्यात येऊ लागला तर या देशात लोकशाही राहिली आहे का याचा विचार करायला हवा. शिवसेना आणि मविआ एकजूट आहे. अशी प्रतिकिया राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

तर संजय राऊतांनी या कारवाईवर आपली पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, मनी लाँड्रिंगमधील एक रुपया जरी आमच्या खात्यात आला असेल तर, सगळी मालमत्ता भाजपला दान करू, असं राऊत म्हणाले. तसेच संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. 'असत्यमेव जयते' असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

कारवाईवर काय म्हणाले संजय राऊत?

राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात ईडीच्या कारवाया वेगाने सुरू आहेत. यावरून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी ईडी (ED) आणि भाजपवर टीकेची झोड उठवली होती. तसेच ईडीवर गंभीर आरोपही केले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही ईडीविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. ईडीचे काही अधिकारी तुरुंगात जाऊ शकतील, असेही राऊत म्हणाले होते. मात्र, आता संजय राऊत यांच्याविरोधातच ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने राऊत यांची अलिबाग आणि दादरमधील मालमत्ता जप्त केली आहे. (Sanjay Raut on ED)

अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरमधील फ्लॅट जप्त केला आहे. या कारवाईनंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कुठली प्रॉपर्टी? आम्ही काय प्रॉपर्टीवाले आहोत का? २००९ साली कष्टातून घेतलेली जागा आणि घर आहे. त्याची साधी चौकशीही कधी झाली नाही. मालमत्ता जप्त केल्याचे मला वृत्तवाहिन्यांद्वारे समजले. मनी लाँड्रिंग केली असं म्हणतात. पण एक रुपया सुद्धा आमच्या खात्यात आला असेल तर, सगळी मालमत्ता भाजपला दान करू, असं आव्हान राऊत यांनी दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.