Ed Raids Today: मोठी बातमी! आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांच्या घरी ईडीची धाड

कथित कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ईडीने १५ ठिकाणी धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे.
Ed Raids Today
Ed Raids TodaySaamtv
Published On

Mumbai News: कथित कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ईडीने १५ ठिकाणी धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने १५ ठिकाणी टाकलेल्या धाडीत IAS अधिकारी संजीव जयस्वाल आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या नावाचाही सामावेश आहे. ईडीच्या धाडीमुळे खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने मुंबईसह ठाणे, नवी मुंबई भागात एकूण १५ धाडी टाकल्या आहेत. आज बुधवारी ईडीने अचानक आदित्य ठाकरे यांचे निकटर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरी धाड टाकली. तसेच सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या घरी धाड टाकली. जयस्वाल हे ठाण्याचे आयुक्त होते तर कोरोना काळात मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त होते.

Ed Raids Today
Sadabhau Khot on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी जे पेरले, तेच उगवले; सदाभाऊ खोत यांची जोरदार टीका

दरम्यान, सुजीत पाटकर यांच्या संबंधित ठिकाणी ईडीने छापेमारी केली. सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. तसेच कोव्हिड काळात लाईफलाईन कंपनीच्या घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूरज चव्हाण कोण आहेत?

दरम्यान, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीने धाड टाकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुरज चव्हाण हे शिवसेनेमध्ये सचिव म्हणून कार्यरत आहेत. यासहित युवा सेनेचे कार्यकारणी सदस्य आहेत. सुरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. चव्हण हे शिवसेना भवन आणि मातोश्री येथे आदित्य ठाकरे यांच्या कार्यालयाची काम पाहतात.

Ed Raids Today
Udayanraje vs Shivendraraje : साता-यात राडा: उदयनराजेंच्या समाेर शिवेंद्रराजेंनी फाेडला नारळ, जे करायचे ते...

सूरज चव्हाण यांच्यावर अनेक युवा सेनेचे पदाधिकारी देखील नाराज होते. विविध निवडणुकांमागे पदड्यामागची गणितं सूरज चव्हाणांच्या हाती असतात. मुंबई महानगरपालिका, राज्यसभा आणि परिषदेच्या निवडणुकांमध्ये सूरज चव्हाणांचा मोठा वाटा आहे.

एक वर्षांपूर्वी पार पडलेल्या राज्यसभा विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या रणनीतीपासून अनेक युवासेना आणि शिवसेनेतील नेत्यांना सूरज चव्हाण यांनी बाजूला ठेवलं होतं. यामध्ये अमेय घोले यांचा समावेश होता.

अमेय घोले यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला आहे. सूरज चव्हाण यांच्यावर आरोप व्हायला लागले, तेव्हा आदित्य ठाकरे यांनी बाजूला केल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com