Sadabhau khot News: एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी गेल्या वर्षी २० जून रोजी बंड पुकारलं होतं. शिंदे गटाचा बंडाचा हा दिवस 'गद्दार दिवस' आहे, अशी टीका भरसभेत उद्धव ठाकरे यांनी केली होती. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याचा सदाभाऊ खोत यांनी समाचार घेतला. 'उद्धव ठाकरेंनी जे पेरले तेच उगवले, अशी टीका केली आहे. (Latest Marathi News)
सदाभाऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, 'उद्धव ठाकरेंनी जे पेरले, तेच उगवले. कोण कोणाचा गद्दार दिवस साजरे करत आहे, ही राजकारणातील विचारांची दिवाळखोरी आहे. शिवसेनेनं भाजपसोबत निवडणूक लढविली, अन् राष्ट्रवादी, काँग्रेससोबत युती केली. नेमके गद्दार कुणी कुणाला म्हणायचे. तसे महागद्दारांनी दुसऱ्याला गद्दार म्हणायचे. सगळेच एका माळेतील मणी आहेत'.
सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, ' अगोदर गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. लग्न ठरवलं एकाबरोबर आणि हळद लावली एकबरोबर अन् अक्षदा एकाबरोबर... यांना काय सज्जन म्हणायचे का? खोके अन् गद्दार म्हणून जनतेचे मनोरंजन करायला लागले. पन्नास खोके म्हणणाऱ्यांनी स्वतःच्या नार्को टेस्ट कराव्या'.
'उद्धव ठाकरे यांच्या हातून चाव्या गेल्या म्हणून पन्नास खोकेवाले म्हणता. हे देखील सुद्धा अलीबाबा चाळीस चोर आहेत. शरद पवार हे धुतल्या तांदळासारखे आहे काय? ज्यांनी राज्यातल्या बँका खाल्ल्या, साखर कारखाना खाल्ला, सूतगिरणी खाल्ली, दूध संघ खाल्ले. यासह राज्याची संपत्ती लुटली. त्या माणसासोबत यांनी युती केली. उद्धव ठाकरे यांनी जनतेचा अपमान केला, मात्र सत्ता गेली म्हणून रडू यायला लागले. मगरीच्या डोळ्यातले अश्रू आहेत, अशी टीका खोत यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.