Drunk Youth Video : सांताक्रुजमध्ये मद्यधुंद तरुणांचा धिंगाणा, भररस्त्यात बाउन्सरसोबत हाणामारी; VIDEO व्हायरल

Drunk Youth Fight Santacruz of Mumbai Area : मुंबईमध्ये मद्यधुंद तरूणांचा राड्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. सांताक्रुज पूर्वेकडील परिसरात ही घटना घडलीय.
सांताक्रुजमध्ये मद्यधुंद तरूणांचा धिंगाणा
Drunk Youth Video Saam Tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही मुंबई

मुंबईमध्ये मद्यधुंद तरूणांनी तुफान राडा केल्याचं समोर आलंय. मुंबईच्या सांताक्रुज पूर्वेकडील एका क्लबच्या बाहेर रात्री उशिरा हा प्रकार घडलाय. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झालाय. सांताक्रुज वाकोला परिसरातील टॉय रूम क्लबच्या बाहेर हा राडा पाहायला मिळाला.

मुंबईमधील धक्कादायक प्रकार

मद्यधुंद अवस्थेत अवस्थेत असलेल्या तरूणांनी क्लबच्या बाहेर धिंगाणा (Mumbai News) घातला. या तरूणांचा आरडाओरडा आणि हाणामारी कॅमेऱ्यात कैद झालीय. ही फ्री स्टाईल मारामारी मद्यधुंद अवस्थेतील तरुण आणि बाउन्सर यांच्यामध्ये होत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा मारहाणीचा व्हिडिओ भावेश चव्हाण या एक्स हॅन्डलरच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलंय. यामध्ये मुंबई पोलिसांना देखील टॅग केलेलं आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, या तरूणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जातेय.

मोठ्याने आरडाओरडा करत धिंगाणा

अनेकदा नशेच्या आहारी गेलेले लोक मोठ्या संकटांना आमंत्रित करतात. काही मद्यधुंद तरूण-तरूणी तर भान विसरून रस्त्यातमध्येच गोंधळ घालतात. अशाच प्रकारे एका सांताक्रुज परिसरात क्लबबाहेर मद्यधुंद तरुण मोठ्याने (Drunk Youth Fight Video Viral) आरडाओरडा करत धिंगाणा घालताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा तरुण इतर काही तरुणांशी गैरवर्तन करत होता. धक्कादायक म्हणजे हा तरूण बाउन्सरसोबतच हाणामारी करताना दिसतोय.

सांताक्रुजमध्ये मद्यधुंद तरूणांचा धिंगाणा
Drunk Man Driving Car Video: दारुच्या नशेत चालवत होता कार; रेल्वे ट्रॅकवर पोहचताच लागली गाढ झोप अन्..., थरारक घटनेचा VIDEO व्हायरल

मद्यधुंद तरूणाचा राडा

नशेमध्ये असलेला तरूण हा अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत (Viral News) आहे. इतर काही लोक मिळून या तरूणाला गाडीत बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु हा तरूण कोणाचेही न ऐकता, पुन्हा बाउन्सरच्या अंगावर धावून जाताना दिसतोय. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर लोकांचा घोळका जमलेला आहे. मद्यधुंद तरूणाचा हा राडा (Viral Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. दारूच्या नशेमध्ये तरूणांनी मोठा धिंगाणा घातलेला आहे. आता याप्रकरणी मुंबई पोलीस नेमकी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

सांताक्रुजमध्ये मद्यधुंद तरूणांचा धिंगाणा
Drunk And Drive Case : मनमाडला ड्रंक आणि ड्राईव्हचा प्रकार; दुचाकीला धडक, रेल्वे सुरक्षा बल निरीक्षकांवर गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com